कोपरगाव(वेबटीम):- कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक जवळ आली की शहर विकासाच्या गप्पा सुरु होतात मात्र कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर ...
कोपरगाव(वेबटीम):-
कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक जवळ आली की शहर विकासाच्या गप्पा सुरु होतात मात्र कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर नागरिकांनी आपली मानसिकता बदलावी असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की कोपरगाव शहरातील प्रस्तापित नेते शहर विकासाच्या गप्पा मारतात त्यांचे कार्यकर्ते शहर विकासावर रसभरीत चर्चा करताना दिसतात,मात्र अनेक वर्षे झाली.नागरिक मात्र प्रस्तापित नेत्याविषयी काहीच बोलत नाहीत शहरातील रस्ते,स्वच्छ व नियमित पाणी अशा नागरिकांच्या एक ना अनेक समस्या आहेत मात्र या समस्या आहे तशाच आहेत प्रस्तापित राजकीय नेत्यांनी दिलेले प्रतिनिधी स्वतःच्या विचाराने अगर जनतेच्या प्रश्नावर आपल्या नेत्यांची मने राखण्यात व शाब्बासकी मिळविण्याच्या नादात काही बोलत नाही त्याच प्रमाणे पदाधिकाऱ्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणताही वचक नाही त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही मागील निवडणुकीत जनतेने प्रस्तापित नेत्यांना धक्का देत लोक नियुक्त अध्यक्ष पद दिले मात्र असे असताना देखील जनतेचा भ्रम निराश झाला असून नागरिकांच्या पदरी शहर विकासाबाबत निराशा पडली
कोपरगाव शहराच्या सर्व समस्यांवर नागरिक खाजगीत बोलत असतात मात्र निवडणुकीत साळसूद पणे विसरून जातात तसेच प्रस्तापित राजकीय नेत्यांच्या दबावामुळे निवडणुका ह्या सर्व सामान्य जनतेच्या हातात नाहीत व निवडणुकीत पडणारा पैशाचा पाऊस यामुळे जनतेची मानसिकता दबली गेली असून या मानसिकतेमुळे शहराचे रस्ते पाणी आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.
कधी काळी गजबजलेली बाजार पेठ असलेले शहर आता मात्र भकास दिसत आहेत मात्र कोपरगाव ची जनता या मानसिकतेतून बाहेर पडली तर शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो त्यामुळे आगामी निवडणुकीत जनतेने आपली मानसिकता बदलून शहर विकासावर काम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी एक व्हावे असे आवाहन केले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत