गावातील समस्या सोडविण्यापेक्षा सरपंच शाळा व्यवस्थापन निवडीसाठी उपोषण करणार का ? : अडसुरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गावातील समस्या सोडविण्यापेक्षा सरपंच शाळा व्यवस्थापन निवडीसाठी उपोषण करणार का ? : अडसुरे

 उंबरे - वेबटीम    उंबरे गावात अनेक समस्या आहेत, पावसामुळे जागोजागी गवत वाढले आहेत, त्यातून डासांचा पादुर्भाव वाढला आहे, रोगराई वाढली आहे, क...

 उंबरे - वेबटीम 

  उंबरे गावात अनेक समस्या आहेत, पावसामुळे जागोजागी गवत वाढले आहेत, त्यातून डासांचा पादुर्भाव वाढला आहे, रोगराई वाढली आहे, कोरोना संकट गडद होत आहे, लसीकरण वाढवणे गरजेचे आहे, असे असताना ह्या समस्या सोडविण्यापेक्षा गावचे सरपंच आणि काही सदस्य हे शाळा व्यवस्थापन निवडी सारख्या छोट्या विषयात उपोषण करून आपले हसू करून घेतील, असे मला तरी वाटत नाही, असे मत शिवसेना तालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य कैलास अडसुरे यांनी व्यक्त केले. 

अडसुरे म्हणाले, आपल्याला गावाने निवडून दिले आहे, त्यामुळे गावातील प्रश्न सोडवणे आपले कर्तव्य आहे. गावात आज अनेक प्रश्न आहेत, हे सोडविण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,  सरपंच स्वतः हुशार आहेत, त्यांचे सर्व सदस्य देखील सुशिक्षित आहे, त्यांना चांगलं वाईट समजत, त्यांना चांगल्या कामाला आम्हीही सर्व सदस्य मदतीसाठी तयार आहोत, मात्र ही विधायक कामे करण्यापेक्षा शाळेसारख्या पवित्र क्षेत्रात राजकारण आणून सरपंच उपोषणाची भाषा करून ते स्वतःचे आणि गावाचेही हसू करून घेणार नाहीत. कदाचित, त्यांचा तो निर्णय नसावा, मात्र जर असेल तर त्यांनी आपले काम काय, आपण करतो काय, याचा एकदा विचार करावा. पालकसभेला आपण गैरहजर होता, त्यामुळे उपसरपंच सभेचे अध्यक्ष होते, त्यांना घटनेने काही अधिकार दिलेले आहे,  हे माहिती नसणे दुर्दैवी आहे. त्यामुळे  चौकशीत जो निर्णय होऊल तो आम्हाला मान्य असेल, मात्र सरपंच आणि सदस्यांच्या आडून जर कुणी जाणीवपूर्वक उद्योग करत असेल तर त्याला धडा शिकवू, असेही अडसुरे म्हणाले आहेत.     
दरम्यान, एका सदस्याने आपला आणि उपोषणाचा काहीही विषय नाही, मला कुणी विचारले नाही, त्यामुळे माझा याच्याशी संबंध जोडू नये, मला शाळेविषयी आदर आहे, ज्यांना राजकारण करायचे त्यांनी खुशाल करावे मात्र मी यात नाही, याबाबत मी अधिकृत पत्र देतो, असेही त्या सदस्याने स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत