नाकर्तेपणा झाकण्यासाठी नगराध्यक्षांकडून तालिबानी चादर पांघरण्याचे सोंग अकबर भाई शेख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नाकर्तेपणा झाकण्यासाठी नगराध्यक्षांकडून तालिबानी चादर पांघरण्याचे सोंग अकबर भाई शेख

  कोपरगाव/प्रतिनिधी येथील नगराध्यक्ष आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी तालिबानी चादर पांघरण्याचे सोंग करत असल्याचा आरोप विद्रोही साहित्यिक अकबर शे...

 कोपरगाव/प्रतिनिधी

येथील नगराध्यक्ष आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी तालिबानी चादर पांघरण्याचे सोंग करत असल्याचा आरोप विद्रोही साहित्यिक अकबर शेख यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे नाव न घेता केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेख यांनी म्हटले आहे की, माणुसकी आणि मानवता या विषयांचा आधार घेऊन बोलायचं असेल तर काही महिन्यांपूर्वी पॅलेस्टाईनमध्ये निष्पाप नागरिकांवर निर्दयीपणे अन्याय झाले. हजारो भगिनींवर अत्याचार झाले, हजारो बालके मारली गेली तर अनेक शहरं उध्वस्त झाली. त्यावेळी माणुसकीच्या नात्याने नगराध्यक्षांनी समर्थनार्थ आपुलकीची भाषा वापरायला हवी होती किंवा अन्याय-अत्याचार करणार्‍यांचा विरोध करत जाहीर निषेध करायला हवा होता. 



शिवाय मुस्लिम समाजातील नेत्यांनाही आवाहन करायला हव होतं. परंतु त्यावेळेस त्यांना माणुसकी आठवलीच नाही. मात्र, आज अचानक अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अत्याचार बघून नगराध्यक्षांना मायेचा पाझर फुटला. याला नेमकामायेचा पाझर म्हणाव की राजकीय षडयंत्र असा खोचक सवाल केला आहे.

नगराध्यक्षांनी मुस्लिम नेत्यांना आवाहन करण्यापेक्षा स्वतःच्या आंतरआत्म्यास आवाहन करावं आणि आपण कोपरगावकरांना दिलेली आश्वासने पूर्ण केली का?, रोज स्वच्छ पाणी देणार होते दिले का?, धूळमुक्त शहर करणार होते केलं का?, भ्रष्टाचार मुक्त कारभार चालवणार होते त्याचं काय झालं?, आपल्यावर विरोधकांनी भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले ! आपण भ्रष्टाचारी नाही हे सिद्ध केलं का?


 आज रोजी रस्त्याची दुरवस्था झालेली बघून आपण केलेल्या गगनभेदी घोषणा आठवता का? विस्थापित टपरीधारकांना न्याय मिळवून देऊ म्हणून आज विस्थापित टपरीधारकांची दिशाभूल केली अस वाटत नाही का; उलट विस्थापित टपरीधारकांना न्याय देणे दूरच परंतु त्यांच्यावर राजकीय बळ वापरून आपण पुन्हा अन्याय केलेला आठवतो का? दर्जेदार कामे करून दिली जातील अशी आश्वासने देऊन केलेल्या कामांचा काय दर्जा काय आहे हे घराघरांत घुसलेल्या नाल्याच्या पाण्याने कामाचा दर्जा दाखून दिला अस का झालं याबाबत स्वतःला प्रश्न विचारला का? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करुन शहाराचं राजकीय वातावरण दूषित करून जुने पत्ते फेकण्याचं काम करत असल्याचा टोला लगावला.





 शेवटी इराण, तुरान आणि तालिबान करण्याऐवजी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावे, मुस्लिम नेत्यांना आवाहन करण्याऐवजी स्वतः आत्मपरीक्षण करावं. कारण तालिबान्यांची निंदा करावी तेवढी कमीच आहे. परंतु, या संदर्भात तुम्ही मुस्लिम समाजाला बाळकडू पाजावे असं तरी मला पटत नाही म्हणून भारतीय मुस्लिमांच्या संयमची पराकाष्ठा करू नये अथवा देशभक्तीची शिकवण तुम्ही तरी देऊ नये असा उपरोधिक सल्लाही दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत