कोपरगावातील प्रभाग पाचमध्ये घरोघरी तुळशी रोपांचे वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावातील प्रभाग पाचमध्ये घरोघरी तुळशी रोपांचे वाटप

कोपरगाव/प्रतिनिधी शहरातील प्रभाग पाचमधील समाजसेवक व मुंबादेवी तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष सुनील फंड यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त घरोघरी जाऊ...

कोपरगाव/प्रतिनिधी

शहरातील प्रभाग पाचमधील समाजसेवक व मुंबादेवी तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष सुनील फंड यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त घरोघरी जाऊन वृक्षारोपणाचे महत्व पटवून देत तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले.


वाढदिवस म्हटलं की, अनेकजण बॅनरबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करतात आणि याच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे निसर्गाला हानी पोहचते. सध्या सुरू असलेले कोविड संकट लक्षात घेता निसर्गाची काळजी घेत व निसर्गात वृक्षारोपाणाचे महत्व पटवून देत सुनील फंड यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.

 

त्यानुसार सर्वात जास्त प्राणवायू देणाऱ्या ३५१ तुळशी रोपांचे ५१ व्या वाढदिवसानिमित्त प्रभाग पाचमध्ये 'एक घर एक तुळस' या मोहिमे अंतर्गत वाटप करण्यात आली. दरम्यान, फंड हे कायमच मुंबादेवी तरुण मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवितात. 



यावेळी अकील अत्तार, संदीप दळवी, संजय जगताप, शिवसेना संपर्क प्रमुख मनोज कपोते, अरविंद मंडलिक, भानुदास लोणारी, सुनील मोरे, सुनील खैरे, लाड सुवर्णकार नरहरी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष प्रकाश भडकवाडे, मनसे तालुका उपाध्यक्ष राहुल पांडे, विवेक फंड, शिवसेना उपशहर प्रमुख गोपाळ वैरागळ, मयूर दळवी, मनोज विसपुते, करणं दळवी, पप्पू गंगवाल, आशुतोष दळवी, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष महेश उदावंत, मयूर वाणी, कृष्णा दळवी, निशांत झावरे, 

किरण सूर्यवंशी, मनोज वैरागळ, किरण घेगडमल, जुबेद अत्तार, विनू खडांगळे,अभय दारूनटे, गोपी विसपुते, ओम कपोते, समाधान कंधे, संतोष राक्षे, हुजेब अत्तार, पत्रकार अक्षय काळे, अक्षय भडकवाडे, सिद्धार्थ पांडे, शुभम अनार्थे, निरंजन खडांगळे, संकेत मंडलिक, विनायक बाविस्कर, भाऊसाहेब नवशे, नासिर अत्तार, विजय उदावंत आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत