सात्रळ येथे गुड मॉर्निग ग्रुपच्यावतीने ऑक्सिज देणाऱ्या लक्ष्मी तरु वृक्षाचे रोपण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ येथे गुड मॉर्निग ग्रुपच्यावतीने ऑक्सिज देणाऱ्या लक्ष्मी तरु वृक्षाचे रोपण

  सात्रळ(वेबटीम) कोरोना  काळातील ऑक्सिजनची  कमतरता, ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यामुळे  झालेले मृत्यू पाहता हवेतील  नैसर्गिक  ऑक्सिजन प्रमाण व...

 सात्रळ(वेबटीम)

कोरोना  काळातील ऑक्सिजनची  कमतरता, ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यामुळे  झालेले मृत्यू पाहता हवेतील  नैसर्गिक  ऑक्सिजन प्रमाण वाढविण्यासाठी  वृक्षारोपण ही काळाची गरज ओळखून  सात्रळ येथील जेष्टांपासून  तर लहानग्या पर्यंत  सहभाग  असलेल्या "गुड  मॉर्निंग " ग्रुप ने पहाटेच्या  वेळेस  फिरायला तसेच व्यायाम साठी   गेल्यावर कॉलेज  परिसरात  साठ  "लक्ष्मी तरू " या जास्त प्रमाणात  ऑक्सिजन  देणाऱ्या  वृक्षांची  लागवड  केले आहे. 


लक्ष्मीतरू  या वृक्षाचे  महत्व  श्री श्री रविशंकर  यांच्या  "आर्ट  ऑफ  लिव्हिंग " मध्ये दिलेले आहे.  दररोज  पहाटे  कॉलेज  परीसरात व्यायाम  साठी येत असलेले ग्रुप  सदस्य  वृक्षरोपण  केलेल्या झाडांचे काळजीने देखभाल करत  असून या पूर्वीही लावलेली झाङे  मोठी झाल्यामुळे  परिसरातील ऑक्सिजन  चे प्रमाण वाढलेले आढळून  येत  आहे. वृक्ष लागवडीच्या  ध्येयाने झपाटलेल्या या ग्रुप सदस्यांनी  या पूर्वीही  लक्ष्मी तरूचे बियाणे, रोप वाटप  केलेले  आहे. 


या ग्रुप चे जेष्ठ  सदस्य  रमेश पन्हाळे, प्रमोद  नालकर अजित जोर्वेकर, संदीप  रोकडे, सादिकभाई  शेख, मुसाभाई  शेख, मोहन कुलकर्णी, ऍड. सुभाष  चोरमुंगे, डॉ. मधुकर  पडघलमल, याकूबभाई शेख, कृष्णा पन्हाळे, गौरव  पन्हाळे, वरद पन्हाळे  हे वृक्षारोपण  कार्यक्रम  राबविण्यात  आग्रही असून परिसरातील वृक्ष संख्या  वाढविण्यासाठी  प्रयत्नशील  आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत