देवळाली प्रवरा/वेबटीम: देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे.नुकतेच राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश स...
देवळाली प्रवरा/वेबटीम:
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे.नुकतेच राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी लेखी आदेश काढून नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणाऱ्या पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
माहे डिसेंबर २०२१ व फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश प्रारीत करण्यात आले आहे.
शासनाने १२ मार्च २०२० रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम २०२० अन्वये सर्व नगरपालिकांमध्ये बहुसदस्यसीय प्रभाग पद्धती ऐवजी एक सदस्यसीय प्रभाग पद्धत्ती लागू केली आहे.यावेळी प्रत्येक प्रभागात एकच सदस्य असेल प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यलयाने प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची सन २०११ ची आकडेवारी विचारात घेतली जाणार आहे.त्यानुसार प्रभागांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्याचे आदेश दिले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनाविरुद्ध रिट पिटीशियन क्रमांक ९८०/२०१९ मध्ये दिनांक ४ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निकालानुसार कार्यवाही करावयाची आहे.
आरक्षणासंदर्भात प्रारूप प्रभाग प्रसिद्धी व आरक्षण सोडतच्या सूचना नंतर देण्यात येतील. नागरपालिकांची मुदत समाप्ती पूर्वी निवडणुका पार पाडणे शक्य होण्यासाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा २३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नगरपालिका निवडणूकीचे प्रभाग रचनेचे तयारी सुरू झाल्याने निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूकीत काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे, आरपीआय आदी पक्षातील कार्यकर्ते बाशिंग बांधून तयार आहे.परंतु राज्यातील सत्येचे गणित पाहता काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना यांची महाविकास आघाडी झाली तर महाविकास आघाडी व भाजप यांच्यात आमनेसामने निवडणूक लढवली जाईल.
एक सदस्यसीय प्रभाग पध्दती झाल्याने अपक्षांना पेव फुटणार आहे.अपक्षांमुळे पक्षातील उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे.निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरू होताच पक्ष संघटनांनी मोर्चे बांधणी व चाचपणी सुरू केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत