पुणतांबा चौफुलीवर दिशादर्शक फलक व सर्कल बसविणे!! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पुणतांबा चौफुलीवर दिशादर्शक फलक व सर्कल बसविणे!!

कोपरगाव/वेबटीम:-  तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील सामाजिक संघटना शिवसूत्र युवा प्रतिष्ठान च्या वतीने अहमदनगर मनमाड रोड कोपरगाव येथे असलेल्या ...

कोपरगाव/वेबटीम:- 


तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील सामाजिक संघटना शिवसूत्र युवा प्रतिष्ठान च्या वतीने अहमदनगर मनमाड रोड कोपरगाव येथे असलेल्या पुणतांबा चौफुली या ठिकाणी सर्कल व दिशादर्शक फलक बसविण्यात यावे असे निवेदन कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले आहे. 


सदर निवेदनावर  शिवसुत्र युवा प्रतिष्ठाण अध्यक्ष सुधाकर वक्ते

उपअध्यक्ष विशाल गुरसळ, 

माजी अध्यक्ष प्रदिप गायकवाड ,राहुल वक्ते, राहुल चव्हाण, अजय सुपेकर,

संतोष जाधव, किरण चव्हाण, विकी चव्हाण, कुलदीपक वक्ते,

विश्वजीत वक्ते,खंडू गांगुर्डे, अक्षय गुरसळ,ॠषी गुरसळ,विकी जगताप,ॠषीकेश मेहेत्रे, ॠषी वक्ते, सुदर्शन कवडे,सुमिता पगारे,गौतम गायकवाड,साईनाथ वायकर, रोहित जावळे,सौरव पवार,गौरव पवार,मयुर गिरमे आदी सदस्यांच्या सह्या आहेत.


सविस्तर वृत्त असे की,  नगर मनमाड रोड हा  दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठिकाण असुन  शिर्डी,कोपरगाव ,संगमनेर औरंगाबाद,पुणे, मनमाड मालेगाव, धुळे आदी  शहरांकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. कोपरगाव शहराजवळुन जाणाऱ्या या रस्त्यावर  पुणतांबा चौफुली हे एक ठिकाण असून येथून नासिक व नागपूर जातो नेहमी वर्दळ असते  या ठिकाणी दिशादर्शक फलक अथवा सर्कल नसल्याने वाहनचालकाचा गोंधळ होतो कुठे जायचे हे लक्षात न आल्यामुळे  गोंधळ होऊन वाहनांची कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढत आहे शिवाय गेल्या काही वर्षांमध्ये  गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अनेकांचे जीव यात गेले आहे तर काहींना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे पुढे या पेक्षा मोठा अनर्थ होऊ नये या साठी या ठिकाणी दिशादर्शक फलक व सर्कल तातडीने बसविण्यात यावे असे निवेदन यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले आहे.


तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनीक बांधकाम उपविभाग कोपरगाव,आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे,कोपरगाव शहर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांना देखील देण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत