कोपरगाव/प्रतिनिधी शहरातील टिळकनगर भागातील संविधान चौकात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सकाळी छत्रपती शाहू महाराज वाचनालयाचे उद्घाटन व...
कोपरगाव/प्रतिनिधी
शहरातील टिळकनगर भागातील संविधान चौकात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सकाळी छत्रपती शाहू महाराज वाचनालयाचे उद्घाटन व वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी वाचनालयाच्या फलकाचे अनावरण नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, नगरसेविका शिंगाडे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्ष वहाडणे यांचा सत्कार संविधान चौकाचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी केला व भारताची संविधान पुस्तिका भेट देण्यात आली. याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष वर्पे यांचा सत्कार सचिन शिंदे यांनी केला आणि त्यांनाही संविधान पुस्तिका देण्यात आली. तसेच उपनगराध्यक्ष कुरेशी यांनाही रवी जाधव यांच्या हस्ते संविधान पुस्तिका देण्यात आली.
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष तौफिक मणियार, जिल्हाध्यक्ष सुनील जगताप, नानासाहेब जगताप, नितीन पोळ, राजेंद्र उशीरे, राहुल खंडीझोड, मनोज शिंदे, रंगनाथ नरसाळे, अशोक शिंदे, शंकर घोडेराव, सुनील जाधव, सचिन अहिरे, दीपक वानखेडे, देविदास तुपसुंदर, संतोष शिंदे, विजय तुपसुंदर, विशाल कोपरे, शंकर बिराडे, मधु पवार, विकी वाघचौरे, आकाश शिंदे, यश शिंदे, सनी गायकवाड, अनिल जाधव व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब मोरे यांनी केले व नितीन शिंदे यांनी आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत