खड़ांबे खु. येथे कृषीदूत वेदांत शेळके यांचे कृषी जागरूकता व कार्यानुभव विषयांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खड़ांबे खु. येथे कृषीदूत वेदांत शेळके यांचे कृषी जागरूकता व कार्यानुभव विषयांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

  राहुरी(वेबटीम)  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम सन २०२१-२०२२ अंतर्गत...

 राहुरी(वेबटीम)


 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम सन २०२१-२०२२ अंतर्गत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयातील चौथ्या वर्षाचे कृषीदूत चि.वेदांत शेळके यांनी खड़ांबे खु.येथील शेतकर्यांना शेतीविषयी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

       तसेच आधुनिक शेती करण्यासाठी सेंद्रिय शेती,संतुलित खते ,फवारणी करतांना घ्यावयाची  काळजी, तणनियंत्रण,एकात्मिक कीड व्यवस्थापन,जैविक खते,ठिबक व तुषार सिंचन याविषयी विविध प्रात्यक्षिके करून शेतकर्यांना बहुमोल मार्गदर्शन केले आहे.

       या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयातिल प्राचार्य डॉ. एस.बी.धोंडे, उपप्राचार्य डॉ.एच.एल.शिरसाठ समन्वयक के.एस.दांडगे,डॉ.व्ही.एस.निकम,डॉ.एस.बी.राऊत,डॉ.एस.व्ही.भोसले, डॉ.वाय.एस.गागरे,यांचे मार्गदर्शन लाभले.

  यावेळी खड़ांबे खु.येथील सरपंच कानिफनाथ कल्हापुरे,प्रभाकर हरिश्चंद्रे,प्रगतशील शेतकरी प्रकाश काशिनाथ हरिश्चंद्रे,शांताराम कल्हापुरे,ग्रामसेवक कारले भाऊसाहेब तसेच खड़ांबे येथील शुभम शेळके,अमोल हरिश्चंद्रे,प्रवीण बोरुडे,भारत नंन्नवरे,जनार्धन मकासरे,नानासाहेब कदम, नितिन साळवे,जेष्ठ तसेच अनुभवी शेतकरी नारायण कारले, आदि शेतकरी आणि ग्रामस्त उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत