देवळाली प्रवरा(वेबटीम):- येथील नगरपालिकेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीतून सत्ताधारी भाजप पक्षाच्या ताब्यातून नगरपालिका काढून घेण्यासाठी व...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
बैठक झाली,पण चाचपणीसाठी- चव्हाण
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नगरपालिका निवडणुकी संदर्भात आम्ही चौघांनी बैठक घेतली नाही. कुणाला बरोबर घ्यायचे कुणाला नही याच्या चाचपणीसाठी आम्ही एकत्रित बसलो होतो.ही निवडणुकींसदर्भातील बैठक असली तरी केवळ चाचपनी करण्याचा प्रयत्न आहे. वार्डनिहाय बैठका घेऊन मतदार व पक्षातील कार्यकर्त्यांचा मते जाणून घेण्यात येऊन योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. राज्यातील सत्तेची समीकरणाप्रमाणे महाविकास आघाडी होणे हे राज्यातील नेत्यांवर अवलंबून आहे.कोणत्याही एका पक्षाने जर स्वबळाचा नारा दिला तर सर्वचजण स्वबळावर निवडणूक लढवतील.
पक्षश्रेष्ठींच्या निर्णय नुसार महाविकास आघाडी- कदम
राष्ट्रवादीचे प्रांत सदस्य अजित कदम यांनी बोलताना सांगितले की, शनिवारी झालेल्या बैठकीबाबत मला कोणतीही कल्पना नाही.राष्ट्रवादीचा पदाधिकारी अथवा कार्यकर्ता बैठकीला उपस्थित नव्हता. राष्ट्रवादी सध्यातरी स्वबळावरचा विचार करत आहे.परंतु भाजपला रोखण्यासाठी भविष्यात आघाडी करण्यातबाबत श्रेष्ठींची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
महाविकास आघाडी करण्यासाठी शिवसेनेत वरीष्ठ पदाधिकारी आहेत;कराळे
शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे म्हणाले की, शिवसेनेचे स्वयंघोषीत पदाधिकारी म्हणून दत्ता कडू या बैठकीस उपस्थित होते.परंतू त्यांच्या मुलाने गेल्या पंचवार्षिक मध्ये शिवसेनेत प्रवेश करुन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती..त्यावेळी दत्ता कडू मंञालयात सचिव पदावर होते. नोकरीमुळे शिवसेनेत प्रवेश केला नाही.आज माञ ते शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचे भासवत असले तरी ते स्वयंघोषित पदाधिकारी आहेत.मी स्वतः सोशल मिडियावरून सांगितले की, नगरपालिका निवडणुकी संदर्भात झालेल्या बैठकीशी शिवसेनेचा कोणताही संबध नाही असे त्यांनी सांगितले.स्वयंघोषित होवून शिवसेने बाबत कोणी ही कोणता निर्णय जाहिर करु नये असे कराळे यांनी सांगितले.
दरम्यान या बैठकीत उपस्थित असलेले दत्ता कडू यांनी ' आम्ही देवळालीकर' या ग्रुपवर बैठकीच्या पोस्ट चालू झाल्यानंतर सध्या निवडणूकीचे वातावरण सुरू असल्याने राजकारण विरहित हा ग्रुप राजकीय भूमिका मांडण्यासाठी केला आहे. या ग्रुपवर राजकीय अड्डा होऊ नये म्हणून निवडणूक होईपर्यंत याचा वापर राजकारणासाठी होऊ नये म्हणून तूर्त हा ग्रुप बंद करण्यात येत आहे.अशी पोस्ट टाकून. या ग्रुपच्या आलेल्या बैठकीच्या संदेशाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले. शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे यांनी आम्ही देवळालीकर या ग्रुपवर टाकलेल्या पोस्ट नंतर हा ग्रुप बंद करण्यात आला आहे. बैठकीला उपस्थित असणारे चारही नेत्यांना आपली चूक या पोस्टनंतर लक्षात आली आहे. आघाडी स्थापन करायची तर सर्वांना बरोबर घेऊन करावी लागणार आहे. आता झालेली चूक ही पुन्हा पुढे होणाऱ्या बैठकीत होणार नाही. याची दक्षता घेण्यात येत असल्याने पुढील होणारी बैठक सर्वाना सामावून घेण्यासाठी हे चारही पदाधिकारी यांनी एकमेकांना सांगत आहे. सर्वांना एकत्र घेऊन भाजपचा घोडा थांबविण्याची किमया करून दाखवावी लागणार आहे.
" "








कोणत्याही टिप्पण्या नाहीत