खड्डेमय रस्त्यांची दुरुस्तीची मागणी सात्रळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खड्डेमय रस्त्यांची दुरुस्तीची मागणी सात्रळ

सात्रळ सोनगाव:-    पंचक्रोशी ते लोणी, प्रवरानगर तसेच इतर गावांना  जोडणारा येथील  प्रवरा  नदी  पूल ते गट  ऑफिस  चौक हा  महत्वाचा   रस्ता खड्ड...

सात्रळ सोनगाव:-  


पंचक्रोशी ते लोणी, प्रवरानगर तसेच इतर गावांना  जोडणारा येथील  प्रवरा  नदी  पूल ते गट  ऑफिस  चौक हा  महत्वाचा   रस्ता खड्डे मय झाला असून या रस्त्याने प्रवासकर्त्यांना  खड्डे  चुकवताना सर्कस  करावी लागत  आहे. शाळा, महाविद्यालयात जाणारे विध्यार्थी, नोकरदार, साखर  कारखाना  ऊस वाहतूक करणारी वाहने, तसेच स्थानिकांना  दिवसभरात  या रस्त्याने ये जा करावे लागत असून अनेकांना या खड्ड्यात  पडल्याचा प्रसाद मिळाला आहे. 


अनेकांना या खड्डेमय  रस्त्यामुळे मणक्यांचे आजार जडले असून याच रस्त्याने परिसरातील आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी ही  वेळोवेळी जात असून  या खड्ड्यात धक्के  बसत असून ही ते सोईस्कररित्या दुर्लक्ष  करत आहेत. खड्डेमय रस्त्याची  स्थानिक  प्रशासन, तसेच लोकप्रतिनिधी  कडे अनेक वेळा तक्रार  करूनही  या कडे दुर्लक्ष  होत  असून नागरिकांमध्ये नाराजीचे सूर  उमटत आहेत. रस्तातील खड्डे तातडीने   बुजवून रस्ता  दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांकडून मोठया प्रमाणात  होतं  असल्याचे दिसून येत आहे. अशीच  परिस्थिती  सात्रळ तांभेरे  रस्त्यांची असून या पूर्वी ही अनेक वेळेस लोकप्रतिनिधी  तसेच संबंधित  सरकारी  अधिकारी यांना  तक्रार करूनही  अद्यापपर्यंत  कोणतीही  कार्यवाही  होताना  दिसत  नसून नागरिक त्रस्त  होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत