सात्रळ(वेबटीम):- सात्रळ येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य...
सात्रळ(वेबटीम):-
उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप हे सात्रळ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदाची धुरा सांभाळत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्यांनी महाविद्यालयात विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. याअगोदर त्यांना आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये उत्कृष्ट पेपर सादर केल्याबद्दल बेस्ट रिसर्च पेपर अवार्ड प्राप्त झालेला आहे. तसेच यूजीसी नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हरियाणा येथील भगत फुलसिंग महिला विश्वविद्यालय यांनी घेतलेल्या शिक्षक उदबोधन वर्गामधील उत्कृष्ट सहभागाबद्दल बेस्ट स्टुडंट पारितोषिकही प्राप्त झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सन्मानाबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी जि.प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आणि महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डाॅ. सोमनाथ घोलप, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत