आंबी(वेबटीम ):- गेल्या दिड वर्षांपासून देशातील शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे क...
आंबी(वेबटीम):-
गेल्या दिड वर्षांपासून देशातील शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र्य लसिकरण सुरू करावे अशी मागणी देवळाली प्रवरा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष ऋषिकेश संसारे यांनी केले आहे.
देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून त्या पुरवठ्या नुसार लसीकरण सुरू आहे.
राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यांमध्ये सातत्याने तफावत आहे. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे अशी मागणी देवळाली प्रवरा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष ऋषिकेश संसारे यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत