पोलिसांनी कॉम्बिन ऑपरेशन राबवावे :- अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पोलिसांनी कॉम्बिन ऑपरेशन राबवावे :- अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम:- ऐन सणासुदीच्या म्हणजेच गणेशोत्सव काळात पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असताना कोपरगाव शहराच्या मुख्य चौकात दारुड्या करून धिंगाणा ...

कोपरगाव/वेबटीम:-

ऐन सणासुदीच्या म्हणजेच गणेशोत्सव काळात पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असताना कोपरगाव शहराच्या मुख्य चौकात दारुड्या करून धिंगाणा घातला जातो त्यामुळे गणेशोत्सव काळात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून लिस्ट वरील गुन्हेगारांचा प्रतिबंध करावा



या लोकांकडून ऐन उत्साहाच्या दिवसात शहराच्या सामाजिक शांततेस गालबोट लावले जाण्याचे प्रयत्न केले जात आहे.


मागील काही दिवसांपूर्वी शहरात हिंदू व मुस्लिम कुटुंबात वैयक्तिक कारणावरून वाद झाले त्यास काही लोकांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता मात्र कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांनी सामाजिक शांतता राखत थेट या वस्तीत मिटिंग घेऊन तो थांबवला असे असले तरी आगामी नगर पालिकेच्या निवडणुकी पूर्वी काही लोकांनी शहर अशांत ठेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून बेकायदेशीर दारू,मटका व कायम लिस्ट वरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी प्रतिबंध करावा अशी मागणी अँड.नितीन पोळ यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत