पत्रकार संघाचे कार्य समाजाला दिशादर्शक- पै.तानाजी जाधव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पत्रकार संघाचे कार्य समाजाला दिशादर्शक- पै.तानाजी जाधव

अकोले प्रतिनिधी   महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपक्रम हे दिशादर्शक आहे. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करून त्यांना प्...

अकोले प्रतिनिधी 


 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपक्रम हे दिशादर्शक आहे. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करून त्यांना प्रेरणा देणारे तसेच पत्रकारांच्या न्यायासाठी ठामपणे उभे राहणे हे समाजाला दिशादर्शक आहे असे प्रतिपादन टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव यांनी केले. तर सलग १८ वर्ष गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा हा उपक्रम दरवर्षी राबविणे हे कौतुकास्पद आहे असे मत आमदार डॉ किरण लहामटे यांनी व्यक्त केले.


           विरगाव ता अकोले येथे आनंदगड शिक्षण संकुलात आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इयत्ता दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थी व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील कोव्हिड योध्दा पुरस्कार सोहळा कार्यक्रमात पै. जाधव अध्यक्षपदावरून बोलत होते. 


      यावेळी अकोले विधानसभा सदस्य आमदार डॉ किरण लहामटे, डिएम उद्योग समुहाचे सागर दोलतोडे, उद्योजक बंडु भागवत, पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, आनंदगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ,ऍड वसंतराव मनकर, अकोले ता.एज्युकेशन चे अध्यक्ष जे.डी.आंबरे, पत्रकार संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, अकोले एज्युकेशन संस्थेचे खजिनदार एस पी देशमुख, पं. स .सदस्य अरुण शेळके आदी उपस्थित होते.


         आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले की, राजकारणात चांगले माणस आले तरच समाजाचा विकास होईल, तालुक्यातील उच्च शिक्षित सरपंच झालेमुळे कोव्हिड ची साथ आटोक्यात राहिली.कोव्हिडं काळात सरपंच, पोलीस पाटील यांचे योगदान आहे त्यांचा सन्मान करणे उचित आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थी व समाजात उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तिंना सन्मानित करण्यात येते. हे काम विश्वास आरोटे नियमित करतात.


    पत्रकार संघाचे हनुमान बनुन सर्व पत्रकारांना मायेचा आधार पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे देत आहे. लहान आणि मोठा असा भेद या पत्रकार संघात नाही बत्तीस हजार पत्रकारांचे संघटन जपणारा आणि सामाजिक बांधिलकी ठेवणारा एकमेव पत्रकार संघ हा मराठी पत्रकार संघ आहे असे प्रतिपादन डिएम उद्योग समुहाचे अध्यक्ष सागरभैय्या दोलतोडे यांनी केले.


 राज्य सरचिटणीस विश्वासराव    आरोटे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ  संजयजी भोकरे व प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या सहकार्याने सर्वांना सोबत घेऊन चालणारा पत्रकार संघ आहे. कोविड काळात मयत पत्रकारांच्या कुटुंबाला धनादेश देत मदतीचा हात संघाने दिला आहे. पत्रकारांचे विमा व संरक्षण यासाठी राज्या पासुन ते केंद्रापर्यत आपली बाजु मांडीत पत्रकार संघ खंबीर उभा राहत आहे.तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत चे कोविड च्या काळातील काम उल्लेखनीय आहे त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत चा सन्मान झाला पाहिजे त्यास सर्वांनी एकमत करून पुरस्कार प्रदान केले. संपुर्ण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीस कोविड योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करणारा पत्रकार संघ हा जिल्ह्यातील प्रथमच आहे याचा आनंद आहे.


       यावेळी शिवाजीराजे धुमाळ,जे.डी. आंबरे पा., ऍड वसंतराव मनकर, धुमाळवाडी चे सरपंच रविंद्र गोर्डे, डोंगरगाव चे सरपंच बाबासाहेब उगले यांनी मनोगत व्यक्त करून गुणवंत विद्यार्थी व कोव्हीड योध्ये यांच्या सन्मानाचे कौतुक केले. कोव्हिडं काळात समशेरपूर येथे कोरोना उपचार केंद्र सुरू केले बद्दल रावसाहेब वाकचौरे यांचा तर अभियंता दिनाचे औचित्य साधून इंजिनियर सुनील दातीर व अक्षय राहणे यांचा धुमाळवाडी चे पोलीस पाटील प्रणाली धुमाळ, पिंपळगाव निपाणी चे पोलीस पाटील संतोष वाकचौरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


         कार्यक्रम यशस्वीते साठी जिल्हाध्यक्ष अनिल रहाणे, जिल्हाप्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे जिल्हाउपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, तालुकाध्यक्ष अशोक उगले, सचिव अनिल नाईकवाडी,सहसचिव दत्तू जाधव, उपाध्यक्ष ललित मूर्तडक, हरिभाऊ फापाळे वसंत सोनवणे,खजिनदार सुरेश देशमुख, भागवत खोल्लम, जगन्नाथ आहेर, सुनील शेणकर, गणेश रेवगडे,सचिन लगड,संजय टिकेकर,सुनील आरोटे,ओंकार अस्वले, शंकर संगारे, निखिल भांगरे, दत्ता हासे,निलेश वाकचौरे,बबन सुरसे, सर्व तालुका कार्यकारिणी तसेच सर्व ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक, विद्यार्थी,पालक,शिक्षक उपस्थित होते. तसेच टायगर ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


स्वागत तालुकाध्यक्ष अशोक उगले यांनी केले,प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अनिल राहणे यांनी केले. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दत्ता जाधव यांनी तर  आभार सोशल मीडिया अध्यक्ष गणेश रेवगडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत