दिव्यांगांना साहित्य वाटप नाव नोंदणी शिबिराचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दिव्यांगांना साहित्य वाटप नाव नोंदणी शिबिराचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधी:- दिव्यांग बंधु-भगिनींना आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व दिव्यांग असल्यामुळे त्यांचे जीवन काहीसे परावलंबी ...

कोपरगाव प्रतिनिधी:-


दिव्यांग बंधु-भगिनींना आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व दिव्यांग असल्यामुळे त्यांचे जीवन काहीसे परावलंबी असते.त्यामुळे या दिव्यांग बंधू भगिनींना आयुष्यात स्वावलंबी करण्याच्या उद्देशातून काही कृत्रिम वस्तूंची नितांत आवश्यकता असते. 





त्याकरीता कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना आवश्यक वस्तू वाटप नाव नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनींना देण्यात येणाऱ्या साहित्याच्या नाव नोंदणी शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवार (दि.४) रोजी होणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.




शिबिरामध्ये दिव्यांग बंधू-भगिनींसाठी आवश्यक असणारे व्हीलचेअर, कृत्रिम पाय, ज्येष्ठ नागरिक स्टिक, कुबड्या, कमोड चेअर, एलबो चेस्ट, फोल्डिंग वॉकर, सी.पी.चेअर, तीनचाकी सायकल यांसारख्या आवश्यक वस्तूंकरीता नाव नोंदणी होणार आहे. 



या शिबिरास विलास कोलगावकर, सहाय्यक मानद सचिव एच.पी.एच व अत्रीनंदन ढोरमारे, जनरल मॅनेजर एडमिन ऑपरेशन एच.पी.एच. यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर शिबिरामध्ये तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत