दिल्लीतील पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनास देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांची उपस्थिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दिल्लीतील पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनास देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांची उपस्थिती

देवळाली प्रवरा(वेबटीम):- केंद्र सरकारच्या नव्याने स्थापित केलेल्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलन इंदि...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-

केंद्र सरकारच्या नव्याने स्थापित केलेल्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलन इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम, नवीदिल्ली येथे करण्यात आले होते. व या कार्यक्रमास संपुर्ण भारतातून २००० लोकांना निमंत्रित करण्यात आले होते, यामध्ये आपल्या देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना देखील निमंत्रण होते, त्या निमित्त सत्यजित कदम हे आज दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी या संमेलनास उपस्थित होते. अखंड भारताच्या १३५ कोटी जनतेतून अवघ्या २००० लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे.

आजच्या संमेलनाची सुरुवात साहित्यातील प्रसिद्ध कवींच्या कवितांच्या पंक्ती सादर करून करण्यात आले यामध्ये कवितेतून आपल्या मराठी मातीचे प्रथम आठवण करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीस नमन व विनम्र अभिवादन करून साहित्यातील कवितांची सुरुवात करण्यात आली.




याच बरोबर भारतातील प्रत्येक राज्यातील महापुरुषांचा व सौदंर्याचा उल्लेख कविता करण्यात आल्या, यामध्ये डॉ. हरिओम पवार, गजेंद्र सोळंकी, कविता तिवारी आदी साहित्यिक उपस्थित होते त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारताचे गृहमंत्री व पहिले सहकार मंत्री अमित शहा यांचे आगमन झाले.



 राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली  व त्यांचे स्वागत करण्यात आले .त्यानंतर प्रेझेंटेशन व्दारे सरकारचे कामांची माहिती देण्यात आली, सहकार क्षेत्रातील मान्यवरांचे मनोगत झाली, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या "सहकार से समृद्धी" या संकल्पनेतून केंद्रसरकार उदयास आले आहे असे सांगण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा याचे मनोगत झाले यामध्ये त्यांनी शेतकरी सशक्तीकरण करण्यासाठी गाव समृद्ध करण्याबरोबर देशाला समृद्ध करणे  हेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितलं, शेती जोडधंदे, सहकारक्षेत्र व सहकारी बँका मजबूत करण्यासाठी ज्या-ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून केल्या जातील असे त्यांनी यावेळी सांगितले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत