देवळाली प्रवरा(वेबटीम):- शहरात सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले असताना डास प्रतिबंधात्मक उपाययोजनाची फवारणी होत नसल्याने शहरातील दवाखान...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
शहरात सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले असताना डास प्रतिबंधात्मक उपाययोजनाची फवारणी होत नसल्याने शहरातील दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली असून पालिकेचेचा ठेकेदार उंटावरुन शेळ्या हाकत असल्याचे वृत्त 'आवाज जनतेचा' वेबपोर्टलवर प्रसिद्ध होताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून देवळाली प्रवरा परिसरात डास प्रतिबंधात्मक फवारणी सुरू करण्यात आली आहे.
देवळाली प्रवरा शहरात ठिकठिकाणी वाढलेले गवत दिसत आहे.गवतामुळे डासाची उत्पती वाढली आहे.वाढलेल्या डासांमुळे देवळाली प्रवरा शहरात मलेरीया,डेंगू,चिकन गुणीया, थंडी, ताप आदि आजाराशी शहरवासिय सामना करीत आहेत. रुग्णालयात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात दिसत असून
देवळाली प्रवरा शहरातील नागरीक साथी आजाराने ग्रस्थ झाले आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील मोकळ्या जागेत व गटारींवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. गवतामुळे डासांची उत्तप्ति होऊन ते घरात घुसून चावणे, पिण्याच्या पाण्यावर बसने आदी प्रकाराने नागरिक त्रस्त आहे.त्यामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहे. टायफाइड, मलेरिया, चिकन गुणीया, थंडी, ताप आदि आजाराचे प्रमाण वाढलेले आहे.
याबाबत आवाज जनतेचा वेबपोर्टलवर सोमवरी सायंकाळी वृत्त झळकताच देवळाली प्रवरा नगरपालिका प्रशासनाने खडबडून जागे होत मंगळवार सकाळपासून देवळाली प्रवरा शहरात डास प्रतिबंधात्मक फवारणी सुरू केली आहे.
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठविण्यासाठी अग्रेसर असलेल्या 'आवाज जनतेचा' वेबपोर्टलने शहरातील आरोग्य समस्या व स्वच्छतेबाबत सडेतोड भूमिका मांडून शहरात डास प्रतिबंधात्मक फवारणी सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत