देवळाली प्रवरा(वेबटीम) शिर्डीतील साईबाबा देवस्थानच्या विश्वस्त पदी प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश शेठ वाबळे यांची तर यांची श्रीराम...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
शिर्डीतील साईबाबा देवस्थानच्या विश्वस्त पदी प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश शेठ वाबळे यांची तर यांची श्रीरामपूरच्या श्रीरामपूरचे सचिन गुजर यांची निवड झाल्याबद्दल देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
गेल्या अनेक महिन्यापासून शिर्डी संस्थानचे विश्वस्तपदाची निवड प्रलंबित होती. या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते असता गुरुवारी रात्री उशिरा संस्थांनच्या नवनियुक्त विश्वस्त पदाची यादी जाहीर झाली.
राहुरी तालुक्यातील गुहा येथील रहिवासी तथा प्रेरणा मल्टीस्टेट चेअरमन सुरेश वाबळे यांची तर श्रीरामपूर येथील सचिन गुजर यांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली.
या दोन्ही नवनियुक्त विश्वस्तांचा देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी अनंत कदम, रविंद्र ढुस, डॉ. संदीप मुसमाडे, मच्छिंद्र कराळे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत