कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरालगत जी उपनगरे गावाला जोडली आहेत , आगदी गावाला खेटून आहेत ( गावातच आहेत ) त्यांच्या पाणी प्रश्न नगरपालिका कधी सोड...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहरालगत जी उपनगरे गावाला जोडली आहेत , आगदी गावाला खेटून आहेत ( गावातच आहेत ) त्यांच्या पाणी प्रश्न नगरपालिका कधी सोडणार ?? विशेष करून कोपरगाव च्या हद्दी लगातचा जेऊरपाटोदा चा काही भाग ???
नवीन २८ रस्त्याचे कामे चालू करण्यापूर्वी रस्त्याच्या खाली , बाजूला / साईड पट्टी मध्ये, जर नवीन पाईप लाईन टाकलेली असेल ( पाणी वितरण व्यवस्था ) तर त्या पाईप लाईन ची पाण्याची ट्रायल झाली का ? घेतली का ??? असा सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला आहे.
पाण्यासाठी शासन दरबारी डिजिटल आंदोलन पद्धतीने प्रयत्न करणारे राजेश मंटाला व शेतीच्या पाणी विषई ग्रामीण भागातील अभ्यासक तुषार विध्वंस यांनी घेतली नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी भेट घेतली.
आजही पावसाळ्यात नगरपालिका ८ दिवसा आड नागरिकांना पाणी देते , ते ही बऱयाच ठिकाणी अस्वच्छ , गढूळ , कमी दाबाने व लाईट गेली तर पाणीच भरता येत नाही , अशी वस्तुस्थिती आहे ..या मुळे लहाण्यापासून ते जेष्ठ नागरिकांन पिरियंत सर्वांना पोटाचे विकार चालू असून खऱ्या अर्थाने महिला भगिनींचे खूप हाल / कसरत होते.या साठी, तसेच पाणी साठवण्यासाठी , टाक्या , कळश्या , डबे ठेवायलाही गरीब , सर्वसमान्य नागरिकांना जागाही नसती ,शहरामध्ये ज्या नवीन पाईप लाईन टाकायचे (पाणी वितरण व्यवस्था ) काम झाले आहे ? त्या ४२ कोटीच्या पाणी योजनेची ट्रायल* झाली पाहिजे व राहिलेले जे काम असेल ते पूर्ण केल्याशिवाय , कोपरगाव शहराला रोज / दिवसाआड / २ दिवसाआड पाणी देता येणार नाही. ( अर्थात शहराला मुबलक साठवण झाले तरी ) आधी हे वितरण व्यवस्थेचे काम करणे गरजेचे आहे . शहरात पाण्याच्या उंचटाक्या ही झाल्यात , पाणी शुद्धीकरण।चा फिल्टरेशन प्लान्ट ही नवीन झाला आहे.
पण जो परियन्त संपूर्ण शहरातील टाकलेल्या पाईप लाईन ची ( पाणी वितरण व्यवस्थेची )त्यात पूर्ण दाबाने पाणी सोडून ट्रायल होत नाही , तो परियन्त लिकेज कुटे आहे , कुटे जोडायचे बाकी आहे , कुटे आजून पाईप टाकावे लागतील हे लक्षात येणार नाही आणि जोपर्यत हे होत नाही , तो परियन्त कितीही जनतेला त्रास झाला आणि ते वैतागून पाणी घाण , अस्वच्छ येते ह्या बाबत कितीही कळकळून बोलले तरी पाणी स्वच्छ मिळू शकणार नाही , हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे .या साठी महिला भगिनींनी / नागरिकांनी नगरपालिकेला पुढे युन हे काम का पूर्ण करत नाही याचा जाबआपआपल्या परीने विचारून हे तातडीने पूर्ण करायला लावले पाहिजे..
*खरे तर नगरपालिकेने ही ट्रायल पूर्ण पाणी दाबाने आत्ताच याच महिन्यात ( सप्टेंबर) घेतली पाहिजे* , कारण भरपूर पाणी असल्याशिवाय पाईपलाईन ची ट्रायल घेता येणार नाही .आत्ता पावसाळा चालू आहे .(नदीला तर पाणी चालूच आहे). कॅनॉलने आपल्या तळ्यां मध्ये पाणी येते , कॅनॉल मधून ओव्हर फ्लो चे पाणी चालू आहे. तो पर्यंत ही ट्रायल होऊन जाईल आणि जनतेचे ही पाणी दिवस ट्रायल घेतांना वाढणार नाही.कारण कॅनॉल ला पाणी चालू आहे आणि धरणातून सध्यातरी पाणी चालू राहील (एक्सेस वॉटर) असे दिसते . धरण भागात पाऊस चालू आसल्यामुळे कँनॉल ला पाणी सोडलेले आहे. यामुळें एक प्रकारे पाईप लाईन चे ऑडिट होईल व त्यातील अर्धवट राहिलेले काम लक्षात येईल व लिकेज कळून जाईल व नगरपालिकेला राहिलेले काम करायला सोपे होइल . *हे जर केले तर या मुळे जनतेला घाण , गढूळ पाणी जे युन त्रास होतो तो बंद होईल*..
आता या महिन्यात धरण क्षेत्रात पाऊस पडत असून भरपूर पाणी आहे , कॅनॉल ने ते ओव्हरफ्लो चे पाणी घेता येईल.अश्या मध्ये ट्रायल नाही घेतली तर पुढं ती पूर्ण धाबाने घेणे कसे शक्य आहे ??
तसेच जे २८ नवीन रस्त्याचे कामे सुरू होणार आहे असे वाटते /कळते ते करायच्या आधी त्या रस्त्याच्या खालून किंवा बाजूने किंवा साईड पट्टी खाली ,पाईप लाईन जर असतील किंवा त्यांची ट्रायल पूर्ण पाणी धाबाने झाली नसेल तर आताच ही योग्य वेळ आहे , पूर्ण पाण्याच्या दाबाने ( हैड्रोलीक ) ट्रायल लवकर करून घ्यावी. तसेच या रस्त्याच्या खाली , बाजूला / साईड पट्टी च्या खाली ,जर पाईप लाईन टाकायची राहिली असेल ,ती टाकून घ्यावी आणि तसेही डांबरीकरण करणेसाठी चे हॉट मिक्स प्लांट हे शक्यतो दिवाळी नंतर खऱ्या आर्थने चालू होतात , तसेच संपूर्ण गावातील पाईप लाईन ची ट्रायल घेतली नसेल तर घेतली पाहिजे.त्या मुळे हे कामे करायला संधी , वेळ नगरपालिके च्या हातात आहे .म्हणजे नवीन रस्ते झाले की परत ते या पाण्याच्या कामासाठी फोडावे , उकरावे लागणार नाही आणि परत ते आता सारखे खराब होऊन जनतेला त्रास होणार नाही. याचा विचार नगरपालिकेने करावा हे भेट घेऊन चर्चा करून मुख्याधिकारी यांना सांगुन विनंती केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत