राहुरीतील हॉटेल साई दर्शनसमोर अपघात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतील हॉटेल साई दर्शनसमोर अपघात

  राहुरी(वेबटीम):- नगर-मनमाड महामार्गावरील  राहुरी कॉलेज परिसरातील हॉटेल साई दर्शन समोर दुचाकीस्वार व सायकलस्वार यांच्यात अपघात होऊन दोघे गं...

 राहुरी(वेबटीम):-


नगर-मनमाड महामार्गावरील  राहुरी कॉलेज परिसरातील हॉटेल साई दर्शन समोर दुचाकीस्वार व सायकलस्वार यांच्यात अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी दोन वाजता घडली आहे.




मंगेश राठोड(रा.चिंचविहिरे) हे आपल्या दुचाकीवरून राहुरीकडे जात असताना सायकल वर असलेले गोरक्षनाथ तारडे(रा.राहुरी फॅक्टरी) यांच्यात  जोरदार धडक झाली. दोघे गँभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेले असताना मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल डोळस, गोरख घाडगे, प्रतीक जाधव व इतर स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून दोघांना उपचारासाठी राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे उपचारासाठी पाठविले. मात्र त्यांना नगरला उपचारासाठी हलविले आहे.
नगर -मनमाड मार्गावरील हॉटेल साई दर्शन समोर पडलेल्या खड्ड्यात हा अपघात झाला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत