राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना परवानगी द्यावी अशी मागणी मनसेच्यावतीने निवे...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील सार्वजनिक मंडळे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कटिबद्ध असल्याने सार्वजनिक मंडळाना परवानगी द्या अशी मागणी आज मनसे तालुकाध्यक्ष अनिल भैय्या डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली देवळाली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी वैभव गाढे, सचिन सोनवणे, सौरभ निकम, सुरज कोठुळे आदी मनसैनिक उपस्थित होते.
तर निवेदनावर युवा संघर्ष प्रतिष्ठानचे प्रसाद शिवले, सिद्धिविनायक मित्र मंडळाचे ऋषिकेश शिरसाठ, राजे छत्रपती प्रतिष्ठानचे जालिंदर झावरे, जाणता राजा मित्र मंडळाचे सुरेश लोखंडे, शांती चौक मित्र मंडळाचे प्रितेश तनपुरे, अंबिकानगर मित्र मंडळाचे प्रशांत काळे, शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संकेत ठुबे, साईराज प्रतिष्ठानचे कृष्णा शिवले, मोरया ग्रुपचे यश सरोदे आदींच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत