देवळाली प्रवरा (प्रतिनिधी):- शहरातील आंबीस्टोअर भागातील संसारे कुटुंबातील लहान मुलांनी महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या योजनेत सहभाग घेऊ...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी):-
शहरातील आंबीस्टोअर भागातील संसारे कुटुंबातील लहान मुलांनी महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या योजनेत सहभाग घेऊन स्वखर्चाने फळझाडे व फुलझाडे असे एकूण मिळून ९०३ झाडांची वृक्षलागवड केलीआहे, संसारे कुटुंबातील लहान व विद्यार्थी असलेल्या मुलांच्या वतीने शासनाच्या माझी वसुंधरा या योजनेत सहभागी होऊन राबविण्यात आलेला हा एक स्तुत्य व आदर्श उपक्रम असल्याचे प्रतिपादन देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले. देवळाली प्रवरा शहरातील आंबिस्टोअर या वस्तीवर राहणाऱ्या संसारे कुटूंबियातील विद्यार्थी मुलांनी महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या योजनेत सहभागी होऊन ९०३ झाडे लावण्याचा उपक्रम राबविला आहे यात झाडे लावण्यासाठी मुलांनी परिश्रम घेतले त्यात स्नेहल संसारे, रेश्मा त्रिभुवन, सायली संसारे, मिलिंद संसारे, निकिता संसारे, मानसी संसारे, तेजस विधाते, अमृता संसारे, आर्यन संसारे, सुरज संसारे, ऋतुजा विधाते, एंजल संसारे, आतिष संसारे, धीरज संसारे, नेत्रा संसारे, आशिष संसारे, प्रथमेश संसारे, आराध्या संसारे आदींचा सहभाग होता व त्यांना कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले.
गेल्या जवळपास दोनवर्षापासून आपण सर्वच कोविड या साथरोगाचा सामना करत आहोत, या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले पहिली लाट आली तिचा फारसा प्रभाव ग्रामीण भागाला झाला नाही परंतु दुसऱ्या लाटेत या साथरोगाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात खेड्यापाड्या पर्यंत जाऊन पोहोचला अनेक नागरिक बाधित झाले तर अनेकांना या रोगाच्या संसर्गाला बळी पडून आपला जीव गमवावा लागला,व्यवहार ठप्प झाले, काहींच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे व व्यवसाय याच्यावर फार मोठा परिणाम झाला व अशातच तिसरी लाट येऊ घातली आहे त्याचा परिणाम बघता गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत त्याचा फार मोठा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाला आहे, मुले दोन वर्षांपासून घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत अशातच आंबीस्टोअर येथील संसारे कुटुंबीयांनी एक कौटूंबिक आदर्श व स्तुत्य उपक्रम राबविला आहे. मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून कुटुंबातील मुलांना शालेय शिक्षण मिळावे यासाठी कुटुंबातील पदवी शिक्षण घेतलेल्या व शिकलेल्या मुलांच्या वतीने घरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी घराच्या प्रांगणात एक घरगुती शाळा चालू करूनशिक्षण देण्याचं काम चालू केलं व त्यात मुलांना निसर्ग प्रेम व कार्यानुभव असावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या योजनेत सहभागी या मुलांच्या माध्यमातून फळझाडे व फुलझाडे असे एकूण ९०३ झाडे लावली.
नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी अजित निकत, कार्यालयीन अधीक्षक बन्सी वाळके व पाणीपुरवठा विभाग प्रमुख गडाख साहेब यांच्या वतीने या कुटुंबाच्या घरी जाऊन या झाडांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली यामध्ये अनेकवर्षे टिकणारे व फळ देणारे ३७८ झाडे आहेत, हा कुटुंबियांच्या वतीने स्तुत्य व आदर्श उपक्रम असल्याचे यावेळी मुख्याधिकारी मुलांशी व कुटुंबियांशी सवांद साधताना बोलत होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत