पुण्याच्या 97 लाख रु च्या चोरीतील आरोपी कर्जत व पुणे पोलिसांकडून अटक.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पुण्याच्या 97 लाख रु च्या चोरीतील आरोपी कर्जत व पुणे पोलिसांकडून अटक..

नगर विशेष (प्रतिनिधी)-     येरवडा पोस्ट गुरन नंबर ५०९/२१ भादवि कलम ३८१ मधील पाहिजे आरोपी विजय महादेव हुलगुडे रा. जामखेड जि.अहमदनग हा व त्याच...

नगर विशेष (प्रतिनिधी)-

   येरवडा पोस्ट गुरन नंबर ५०९/२१ भादवि कलम ३८१ मधील पाहिजे आरोपी विजय महादेव हुलगुडे रा. जामखेड जि.अहमदनग हा व त्याचे साथीदार पुणे येथून दिनांक 5.10.2021रोजी 97 लाख रुपये ची बॅग चोरी करून पसार झाले  होते. नमुद आरोपीचा शोध येरवडा पोलिस व गुन्हे शाखा पुणे शहर हे घेत होते.त्या अनुषंगाने येरवडा पोलीस आणि क्राईम युनिट 5 यांनी कर्जत पोलिस स्टेशनला नमूद आरोपीचा शोध घेणे बाबत कळविले होते. मा. पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांनी सदर आरोपींचा शोध घेणेबाबत सूचना दिल्या होत्या. 


कर्जत पोलीस तपास करत असताना सदर चे आरोपी विर ता. पुरंदर जिल्हा पुणे येथे असल्याची खात्रीशीर बातमी बातमीदाराकडून मिळाली. आरोपी कर्जत-जामखेड परिसरातील असल्याने त्यांची गुन्ह्याची पद्धत माहिती असल्याने कर्जत पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या. क्राईम युनिट 5 चे जवानांना ही वीर येथे येण्याबाबत कळविले. आरोपी वीर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या ठिकाणी जाउन शाळेजवळ लपून बसलेले होते. 

आरोपी 

1)विजय महादेव हुलगुंडे वय 25 वर्ष रा .राहणार काटेवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर व त्यास  मदत करणारा आरोपी 

2) नाना रामचंद्र माने वय 25 वर्षे राहणार मलठण तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी नाना माने मिळून आला आणि आरोपी विजय हुलगुंडे पळून गेला, त्यास कर्जत पोलिसांनी पाठलाग करून पकडला. आरोपींना कर्जत पोस्टे येथे आणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोस्टेचे तपासी अंमलदार सपोनि रवींद्र आळेकर आणि क्राईम युनिट 5 चे सपोनि प्रसाद लोणारे यांच्या ताब्यात देण्यात आले. 


कर्जत आणि पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली. आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले. पुणे पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, प्रसाद लोणारे व त्यांचे पोलीस जवान यांनी कर्जत पोलिसांच्या मदतीने 60 लाख रु हस्तगत केले असून कर्जत पोलिसांनी रक्कम हस्तगत करण्यासाठी मोठी मदत पुणे पोलिसांना केली. पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहे.

  

सदरची कारवाई मा .मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.सौरभ अग्रवाल अपर पोलिस अधिक्षक अहमदनगर, मा . आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत 

तसेच

मा. पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, पुणे शहर

मा. श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त गुन्हे,

मा. किशोर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर,

मा. लक्ष्मन बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा,

यांचे मार्गदर्शनाखाली 


पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार श्याम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम कर्जत पोलिस स्टेशन तसेच पोलीस निरीक्षक युनूस शेख, हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, रवींद्र आळेकर, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, अश्रूबा मोराळे, अमजद शेख, कैलास डुकरे, चेतन चव्हाण, गणेश वाघ पुणे शहर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत