कोपरंगाव(वेबटीम):- कोपरगावात शहरात आता ४ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धरणात पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने कोपरगांव ...
कोपरंगाव(वेबटीम):-
कोपरगावात शहरात आता ४ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.धरणात पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने कोपरगांव शहरात मंगळवार दि ५ ऑक्टोबर पासुन चार दिवसाआड करण्यात येणार असे मुख्याधिकारी कोपरगाव यांनी कळविले आहे.याबाबत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी म्हंटले की, नगरपालिका म्हणते की ५/१०/२०२१ पासून धरणात मुबलक पाणी साठा असल्या मूळे पाणी चार दिवसाआड करण्यात आले , याचे स्वागत आहे .मग पावसाळ्यात या मागील दोन महिन्यांमध्ये म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये का नाही नदीला व कॅनॉल ला पाणी असताना पाणी ४ दिवसांआड केले ?? ( पण इलेक्शन आले म्हणून तर नाही ना ???? लोकांना गप्प करण्यासाठी ??? !) वेळ काढून / मारून नेण्यासाठी ???? जनतेला आव्हान की आत्ता मुबलक पाणी आहे हे सिद्ध झाले आहे. जर ट्रायल या महिन्यात घेतली नाही तर परत इलेक्शन झाले की परत ८ मग १० , १५ , २३ दिवसाआड पाणी होणार..
जो पर्यंत नगरपालिका १०० % पाणी प्रेशरने हैड्रोलीक ट्रायल आत्ता याच महिन्यात, टाकलेल्या नवीन पाईप लाईनची ( ४२ कोटी पाणी योजनेची ) घेत नाही , घेतली नाही ,तर ही लोकांच्या डोळयांत दिवसा ढवळ्या धूळ फेक करत आहे फसवत आहे हे जनतेनी लक्षात घ्यावे. आत्ता धरणात भरपूर पाणी आहे आणि कॅनॉल ओव्हरफ्लोव चालू आहे , हीच ती खरी वेळ आहे ट्रायल ची..आशा धोरणाने जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी नगरपालिका मिळूच देणार नाही व स्वच्छ व मुबलक पाण्यासाठी वेड्यात काढत राहतील. ट्रायल जर नाही घेतली आणि नवीन रस्ते जर केलेत, तर परत रस्ते झाल्यावर पाण्याची ट्रायल घेतली तर परत रस्ते फेडावे लागणार , अक्षरशः रोड फुगतील आणि परत रस्त्याची हीच चाळणी होणार .म्हणजे खड्यांचे रस्ते आणि पाणी ८,९,१०,१३,१५,२३ दिवसाआड खराब अस्वच्छ पाणी हेच जनतेच्या नशिबी राहील,.जनतेने याचा विचार करावा व नगरपालिकेने ३६५ दिवसांची पाणी पट्टी घेऊन करदाते यांना तातपुरत्या स्वरूपात ४ दिवसाआड पाणी केल्याचे सांगून यात धन्यता मानू नये. असे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सामाजिक पाणी आंदोलक राजेश मंटाला, तुषार विध्वंस यांनी म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत