अहमदनगर भरोसा सेलच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहमदनगर भरोसा सेलच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

  नगर विशेष प्रतिनिधी दि.१८:- पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर भरोसा सेल यांच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ यांचे न्यू आर्...

 नगर विशेष प्रतिनिधी दि.१८:-


पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर भरोसा सेल यांच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ यांचे न्यू आर्ट्स कॉमर्स अण्ड सायन्स कॉलेज तसेच रेसिडेन्शिअल जुनियर कॉलेज तसेच हायस्कूल यांचे संयुक्त विद्यमाने कॉलेज क्रीडांगण तसेच जिमखाना परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

      सदर कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक सो व अप्पर पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक  (गृह) सो श्री डांगे साहेब यांचे अध्यक्षतेखाली तसेच प्राचार्य श्री डॉ. झावरे सर प्राचार्य श्री दोडके सर श्री साबळे सर श्री मगर सर श्रीमती मोटे मॅडम तसेच शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे उपस्थितीमध्ये पार पडला. 

      विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धन पर्यावरण रक्षण यांचे महत्त्व समजावे तसेच पोलीस व विद्यार्थी यांच्यामधील दरी कमी होऊन त्यांच्यामध्ये सुसंवाद घडला जावा मा सामाजिक बांधिलकी जपली जावी अशा अनेक उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते केलेल्या वृक्षांचे योग्य संवर्धन व्हावे करिता सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती उबरहंडे / देशमुख मॅडम यांनी NSS व NCC चे दोन दोन विद्यार्थ्यांमध्ये एक एक वृक्ष दत्तक म्हणून दिले सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भरोसा सेल प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पल्लवी उबरहंडे/ देशमुख तसेच भरोसा सेलचे सर्व अंमलदार यांनी विशेष विशेष प्रयत्न करून सदर प्रयत्न करून सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत