कोपरगाव पिपल्स बँकेची सभासदांना दिवाळी भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव पिपल्स बँकेची सभासदांना दिवाळी भेट

कोपरगाव/प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या कोपरगाव पिपल्स बँकेने सभासदांना नुकतेच १५ टक्के प्रमाणे लाभांशाचे वितरण केले. याबद...

कोपरगाव/प्रतिनिधी:-

अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या कोपरगाव पिपल्स बँकेने सभासदांना नुकतेच १५ टक्के प्रमाणे लाभांशाचे वितरण केले. याबद्दल सभासदांनी बँक व्यवस्थापनाचे आभार मानले.



सदर लाभांश वितरण वेळी बँकेचे सभासद मनमोहन गुजराथी, कांतीलाल जोशी, बाळासाहेब पांढरे, अॅड. वसंत कपिले, रसीकचंद कोठारी उपस्थित होते. तत्पूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभेतील मंजुरीनुसार सभासदांना सन २०२०-२१चा लाभांश १५ टक्केप्रमाणे घोषित केला होता त्याचे तत्काळ वितरण सभासदांच्या खाती वर्ग करण्यात आले. यावेळी सभासद बाळासाहेब उर्फ अनिल पांढरे यांनी नमूद केले की, कोपरगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांची कामधेनू असलेल्या या बँकेने पारदर्शी कारभार ठेवत कोरोना काळात बाजारातील मंदीची परिस्थिती असतानाही उत्तुंग भरारी घेत सभासदांना १५ टक्के लाभांश देते यावरुन बँक निश्चितच प्रगतीकडे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे हे स्पष्ट होते. बँकेचे सर्व कर्मचारी, संचालक मंडळ, चेअरमन यांनी खर्चात बचत करुन, काटकसरीचे धोरण अवलंबून बँकेची नफा क्षमता वाढविली आहे. बँक थकबाकीदार सभासदांनाही सन्मानाने वागणूक देऊन व कायदेशीर कारवाई न करताही योग्यप्रकारे वसुली करीत आहे हेच या बँकेचे वैशिष्ट्य असल्याचे अधोरेखित केले.




अॅड. वसंत कपिले म्हणाले, बँकेची ग्राहक सेवा ही अतिशय उत्तम असून सर्व सेवक वर्ग व संचालक मंडळ यांचे टीमवर्कने बँक कोपरगाव तालुक्यात नावलौकिकास पात्र झाली आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन कैलासचंद ठोळे म्हणाले, बँकेचे ३१ मार्च, या वर्षाअखेरीस वरीष्ठ अधिकारी वर्ग हे कोविडने आजारी असल्याने व उपचार घेत असतानाही बँकेचे तत्कालीन चेअरमन अतुल काले यांनी सर्व संचालक व सेवकांचे  मदतीने कर्ज वसुलीवर भर देऊन बँकेचा एनपीए सात टक्केच्या आत राखण्यात यश मिळविले. बँकेचे अधिकारीही हाॅस्पीटलाईज असताना त्यांनी बँकेशी सतत संपर्क ठेऊन वसुलीवर लक्ष केंद्रीत केले. अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी डाॅ. विजय कोठारी, सुनील कंगले, अतुल काले, सुनील बंब,  वसंत आव्हाड, यशवंत आबनावे, हेमंत बोरावके, अॅॅड .संजय भोकरे, सेवक प्रतिनिधी वीरेश पैठणकर, अशोक पापडीवाल, जनरल मॅनेजर दीपक एकबोटे, असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत