"नुकसान झाली त्यांना मदत पण ज्या शेतमजुरांना कामच नाही त्यांचे काय?"-अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

"नुकसान झाली त्यांना मदत पण ज्या शेतमजुरांना कामच नाही त्यांचे काय?"-अँड.नितीन पोळ

कोपरगाव(वेबटीम):- संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला असून नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून सरकार मदतीच्या घोषणा करेल मात्र ...

कोपरगाव(वेबटीम):-


संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला असून नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून सरकार मदतीच्या घोषणा करेल मात्र ज्या मजुरांच्या हाताला कामच नाही त्याना काय देणार?असा सवाल लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला.



आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की महाराष्ट्र भर पडलेल्या पाऊस व महापुराने शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले सधन शेतकरी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मदत मिळवतात मात्र यात सर्व सामान्य शेतकरी मदती पासून वंचित राहतात.



शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा तातडीने सरसकट मदत जाहीर करावी .

शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे नुकसान झाल्या मुळे या वर्षी मजुरांना मका पिकाची निंदणी,सोंगणी तसेच लाल कांदा पिकाची लागण निंदणी ही कोणतीच कामे मिळाली नाही त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही मागील काही दिवसां पासून करोना आजार व आता महापूर यांनी मजुरांवर उपास मारीची वेळ आली आहे

त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते मात्र शेतमजूर  यांच्या कडे शासनाचे कोणतेही मदतीचे धोरण नाही  या निमित्ताने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळेल हो पण शेत मजूर उपाशी मरत आहे त्याचे काय? व ऐन सणासुदीच्या दिवसात हाताला काम नसल्याने शेतमजुर आर्थिक संकटात आहे त्यामुळे शासनाने शेतमजुरांच्या देखील मागणीचा विचार करावा असे या पत्रकात म्हटले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत