सात्रळ येथे डेव्हलोपमेंट प्रोग्राम शिबीर संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ येथे डेव्हलोपमेंट प्रोग्राम शिबीर संपन्न

  सात्रळ/वेबटीम:- सात्रळ ग्रामपंचायत  व  पंचायत  समिती  राहुरी  यांच्या  संयुक्त संयोजनाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत पंचायत  समि...

 सात्रळ/वेबटीम:-

सात्रळ ग्रामपंचायत  व  पंचायत  समिती  राहुरी  यांच्या  संयुक्त संयोजनाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत पंचायत  समिती  गण स्तरावरील ग्रामपंचायत  डेव्हलोपमेंट प्रोग्राम  शिबीर  सात्रळ येथे  पार पडले. या शिबिरात  15व्या  वित्त आयोग 2022-23चे आराखडे बनविण्यासाठी चे मार्गदर्शन करण्यात  आले. सात्रळ गणातील  आठ  गावांमधील ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य  उपस्थित  होते. या मार्गदर्शन  शिबिरात  पंचायत  समिती  चे  विस्तार  अधिकारी डी. जी. दळे यांनी 15व्या  वित्त  आयोग आराखडा  तील विविध  विषय बाबद मार्गदर्शन  केले., यामध्ये  ग्राम  स्वच्छता, पाणी पुरवठा, महिला सुरक्षा आढावा, बाळ आरोग्य  सुधारणा तसेच येणाऱ्या  ग्राम निधीचा  योग्य विनियोग कसा करावा या बाबतची मार्गदर्शक  तत्वाचे विश्लेषण  केले.

या प्रसंगी  या गणातील पंचायत  समिती  सदस्या वैशालीताई  अंत्रे, अंगणवाडी  च्या कल्हापुरे ताई, सात्रळ चे सरपंच  सतिष ताठे, ग्रामपंचायत  जेष्ठ  सदस्य  रमेशराव  पन्हाळे, उपसरपंच  तांबोळी, ग्रामविकास  अधिकारी  हैदरभाई  पटेल, तसेच गणातील ग्रामपंचायतिचे  पदाधिकारी  मोठया  संख्येने  उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत