सात्रळ महाविद्यालयात पर्यायी उर्जा साधने या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ महाविद्यालयात पर्यायी उर्जा साधने या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

सात्रळ,दि.७:-   सात्रळ येथील लोकनेत डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व वि...

सात्रळ,दि.७:-

 सात्रळ येथील लोकनेत डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘अल्टरनेटीव एनर्जी रिसोर्सेस फॉर फ्युचर’ या विषयावर भूगोल, पदार्थविज्ञान आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यशाळेचे दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजन कारण्यात आले.

           

      कार्यशाळेच्या सुरुवातीला भूगोल विभागप्रमुख डॉ. एन. एम. पाटील यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. जयश्री सिनगर यांनी कार्यशाळेतील साधन व्यक्ती, सहभागी प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. (डॉ.) एस. एस. घोलप यांनी पर्यायी उर्जासाधनांच्या विकासाचे महत्व स्पष्ट केले. 

          सदर कार्यशाळेत गुजरात मधील प्लाझ्मा संशोधन  संस्थेतील संशोधक डॉ. गायत्री ढमाले व पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील  सहा. प्राध्यापक डॉ. शशिकांत गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले. आपल्या संगणकीय सादरीकरणात डॉ. गायत्री ढमाले यांनी पर्यायी उर्जा साधनांचे प्रकार व त्यांचे महत्व विशद केले. प्लाझ्मा उर्जा ही संकल्पना स्पष्ट करून या स्वरुपातील उर्जा ही भविष्यात एक शाश्वत व सक्षम उर्जा प्रकार म्हणून उपलब्ध होऊ शकेल असे त्या म्हणाल्या.

     डॉ. शशिकांत गुंजाळ यांनी आपल्या संगणकीय सदरीकरणातून सर्वच पर्यायी उर्जा साधनांचा सखोल आढावा घेतला. पवन उर्जा, सौर उर्जा, अणू उर्जा, भू औष्णिक उर्जा या पर्यायी उर्जा प्रकारांपैकी पवन उर्जा विकासाला भारतात अधिक वाव असल्याचे ते म्हणाले. पर्यायी उर्जा साधनांच्या वापरातून पर्यावरणाचे प्रदूषण टाळणे शक्य होईल व ही उर्जा साधने नाशवंत स्वरूपातील पारंपरिक उर्जा साधनांना एक उत्तम पर्याय निर्माण करु शकतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

  महाविद्यालाचे उपप्राचार्य प्रा. डी. एन. घोलप आणि पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. निलेश कान्हे यांनी साधन व्यक्तींचा परिचय करून दिला. तर  भूगोल विभागातील प्रा. आर. एस. भडकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत