आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष सर्व जागा लढवणार : आकाश नागरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष सर्व जागा लढवणार : आकाश नागरे

कोपरगाव/प्रतिनिधी:- आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुकांत काँग्रेस सर्वच जागा लढविणार असल्याचा निर्धार काँग्रेसचे...

कोपरगाव/प्रतिनिधी:-


आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुकांत काँग्रेस सर्वच जागा लढविणार असल्याचा निर्धार काँग्रेसचे युवा नेते आकाश नागरे यांनी व्यक्त केला.


अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक कोपरगाव येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये मंगळवारी (ता.१२) पार पडली. या बैठकीस अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक गणपत सांगळे, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे व रेनबो स्कूलचे सचिव संजय नागरे उपस्थित होते. 


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षाची रणनीती व धोरण आणि कार्यकर्ता मार्गदर्शन हे या बैठकीचे प्रमुख उद्देश होते. काँग्रेस पक्ष हा जनसामान्यांचे प्रश्न मांडणारा व त्यावर मार्ग काढणारा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही पूर्ण ताकदीनं समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन युवा नेते आकाश नागरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे ज्ञानदेव वाफारे यांनी सांगितले.


स्वर्गीय लहानू नागरे यांचं काँग्रेस पक्षासाठीचं योगदान अतुलनीय आहे आणि त्यांचाच वारसा समर्थपणे आकशजी पुढे चालवतील हा विश्वास आहे, असे मत जिल्हा बँकेचे संचालक गणपत सांगळे यांनी व्यक्त केले.


आज आम्ही सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले. आम्हाला आनंद आहे की आकाश नागरे यांच्या रूपाने पक्षाला योग्य व सुसंस्कृत नेतृत्व लाभले आहे, असे मत शिर्डी संस्थानचे विश्वस्त व काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष  सचिन गुजर यांनी व्यक्त केले.


कोपरगाव तालुक्यात व नगर जिल्ह्यात येत्या काळात काँग्रेस नवीन उभारी घेणार आहे आणि आकाश नागरे यांच्यासोबत मिळून आम्ही सर्व पदाधिकारी तरुण कार्यकर्त्यांची एक नवीन फळी निर्माण करणार आहोत, असे मत जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे यांनी व्यक्त केले. 


शेवटी युवा नेते आकाश नागरे म्हणाले, आमचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शाखाली काँग्रेस पक्ष कोपरगावमध्ये आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व बाजार समिती निवडणुका पूर्ण ताकदीने सर्व जागा लढवणार आहे. यामध्ये असंख्य तरुणांना संधी देऊन काँग्रेस पक्षाला प्रबळ करण्याचा संकल्प केला असल्याचेही नमूद केले.


प्रशांत आहिरे यांनी प्रस्तावनेत कोपरगाव काँग्रेस कमिटी व संलग्न सर्व फ्रंटल सेलच्या कारभारावर भाष्य केले व येणाऱ्या काळात आकाश नागरे यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला नवीन उभारी देण्याचे काम व येत्या काळात आकाश नागरे हे सक्षम नेतृत्व म्हणून कोपरगावात उभे असेल यात शंका नाही असे प्रतिपादन केले.


अनुसूचित जाती शहराध्यक्ष  रवींद्र साबळे, महिला जिल्हाध्यक्षा सविता विधाते यांनी श्रेष्ठींकडे पक्षवाढीच्या दृष्टीने विविध मागण्या केल्या आणि युवक काँग्रेस उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी आभार मानले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते संजय नागरे, नितीन शिंदे, सुनील साळुंखे, जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष तुषार पोटे, अ. जा. विभाग शहराध्यक्ष रवींद्र साबळे, अ. जा. महिला विभाग जिल्हाध्यक्षा सविता विधाते, यादवराव त्रिभुवन, समाधान गायकवाड, दत्ता डोखे, प्रशांत खरात, अजिंक्य बनसोडे, कौस्तुभ चिंचपुरे, रोहन कदम, अबू मणियार, युनूस हसन, सचिन होन, शैलेश दिवाकर, नितीन मारसाळे, राजेंद्र घोडराव व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत