देवळाली प्रवराचे सुपुत्र जगदिश कदम यांच्या पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराचे सुपुत्र जगदिश कदम यांच्या पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी!

अहमदनगर(वेबटीम):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आतेभाऊ व  देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र जगदीश कदम यांच्या घरी ईडीने आज सकाळीच धाड ट...

अहमदनगर(वेबटीम):-

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आतेभाऊ व  देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र जगदीश कदम यांच्या घरी ईडीने आज सकाळीच धाड टाकली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचे समजते.

जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते अजित पवार यांचे आते भाऊ आहेत. कदम हे पुण्यातील सहकार नगरमध्ये राहतात. त्यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड मारली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कदम हे मुंबईतआहेत. घरी ईडीने धाड मारल्याचं कळताच कदम हे मुंबईहून पुण्याकडे निघाले असल्याचे समजते.

दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते. तर कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. त्यानंतरही ईडीकडून धाड मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत