तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना रस्तावर फिरू देणार नाही. - जगदिश ढुस - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना रस्तावर फिरू देणार नाही. - जगदिश ढुस

देवळाली प्रवरा(वेबटीम):- जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-


जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्या तसेच त्यांच्या बहिणींच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले असून केंद्र सरकारच्या या कृत्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस तथा राष्ट्रवादी सोशल मीडिया चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष जगदिश ढुस तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष ऋषिकेश संसारे यांनी निषेध व्यक्त केला आहे.


        राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या काही खाजगी कंपन्यांवर आयकर विभागाने छापे टाकले आहे.तसेच अजित पवार यांच्या कोल्हापूर व पुणे येथील बहिणींच्या घरावर ही आयकर विभागाने छापे टाकले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत असंतोष पसरला आहे.केंद्र सरकारने राजकीय द्वेषापोटी अजितदादा पवार यांच्या कुटुंबियांवर ही कारवाई केली आहे.त्यामुळे गुजराती मारवाडी लोकांनी अजितदादा पवार यांच्यावर सूड उगारु नये,अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल,असा इशारा ही   जगदिश ढुस यांनी दिला आहे.केंद्र सरकारने हे सुडाचे राजकारण बंद करावे,अन्यथा भाजप सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा ही जगदिश ढुस यांनी दिला आहे. जगदीश ढुस तसेच ऋषिकेश संसारे हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक आहेत. 

गुजराती मारवाडी लोकांनी एक समाजाभिमुख,लोकहितकारी,लोकप्रिय नेतृत्वाचे खच्चीकरण करण्यासाठी हा रचलेला एक कुटील डाव आहे.पण या लोकांच्या डावाला आमचं नेतृत्व घाबरणारं नाही.त्यामुळे केंद्र सरकारने राजकीय सूड घेण्याचे हे धंदे बंद करावेत.अन्यथा रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा जगदिश ढुस व ऋषि संसारे यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत