राहुरी फॅक्टरी येथे 26 वर्षांनंतर 'त्यांनी' दिला आठवणींना उजाळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे 26 वर्षांनंतर 'त्यांनी' दिला आठवणींना उजाळा

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्री.छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयातील सन -1994 मधे शिकत असलेल्या इयत्ता दहावीतील माजी विद्य...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील श्री.छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयातील सन -1994 मधे शिकत असलेल्या इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा येथे उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी याच शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री. झिने सर होते

व्यासपिठावर प्राथमिक शिक्षक श्री.शेटे, श्री.शेळके, श्री.आढाव, श्री.मुठे, श्री.वारूळे,श्री.काकङ, 


श्री.ठाकरे,श्री.गोपाळे,श्री.साळवे, श्री.खेङकर, श्री.भंङारी, श्री.पारखे, श्री.जगताप, श्री.मांगुङे, श्री.नेवासकर, श्री.कराङ, श्री सय्यद ,श्री.धावङे आदि शिक्षक तसेच शिक्षिका सौ.खाटेकर, सौ.रसाळ,सौ.संसारे, सौ.पालवे,


सौ.सगळगीळे सौ.मुठे,श्रीमती लोखंडे, श्रीमती गोसावी, जावरे, कराळे,श्रीमती पवार वहीणी,हे प्रामुख्याने उपस्थित होते.मेळाव्यापूर्वी बसस्थानक परिसरातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रमुख     मान्यवरांच्या हस्ते पूष्हापर अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच घोषणा देण्यात आल्या .


आलेल्या उपस्थितांनी आपली नावे व आपण सध्या काय करतो याचा अल्पसा परिचय मान्य वरांना करून दिला.ज्यांचे दु:खद निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  उपस्थितामधून पत्रकार राजेंद्र साळवे, प्रफुल्ल जोशी, आरपीआय चे 


विलास साळवे, शैलेश परदेशी, नरेंद्र ढमाले, तसेच ङाॅ. किशोर सोनवणे या सर्वांनी आपल्या मनोगतातून शाळेत असतानाच्या जून्या आठवणींना उजाळा करून दिला व उपस्थितांना हास्यकल्लोळात नेले.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक  श्री.वारूळे यांनी सांगितले की,आजच्या या मेळाव्यातून मनाला भावणारे व हृदयात स्पर्श करून जाणारे प्रेम आज मी घेउन जाणार आहे. खरोखर आज मला सेवानिवृत्ततेचे वेतन मला आपल्या सारख्या यशोशिखरावर पोहोचलेल्या विद्यार्थी यांचे कङून मिळाले.श्री.गोपाळे यांनी सांगितले की,विद्यार्थी आपल्या शिक्षकांना जेवढा ओळखतो तो त्याच पद्धतीने आपला जीवनप्रवास सूरू करतो.श्री.भंङारी यांनी सांगितले की, राष्ट्र उभारणीत शिक्षक फार महत्वाचे काम करतो.सर्व मित्रांना मदत करा.आई वङीलांची सेवा. तसेच गरजू मित्राला मदतीचा हातभार लावावा. 


यावेळेस संजय धावङे, ङाॅ.निलेश घमंङी,कैलास कोबरणे, प्रसाद शिरसाठ,रामकृष्ण कोबरणे, वसंत ङौले, जगन्नाथ शेलार, बाळासाहेब उंङे, ङाॅ.अखिल राउत, किरण नवले, दिपक जगताप, संदीप वाकचौरे, महेश भाग्यवान, जालिंदर पावसे, दतात्रय शिंदे, सुरेश भंङारी, उमाकांत अनारसे, काशिनाथ आङभाई , दादा मोरे, सुभाष आहेर, अशुतोष ढुमणे,राजेंद्र होन,प्रदीप बोरसे, गोकर्ण सानप, अजित ढूस, दीलीप बेलकर, प्रदीप उंबरकर, महेंद्र खरात, दत्ता लहारे, बाबुलाल सय्यद, अजिज शेख, किरण शेलार,संदीप वाघचौरे,विजय गव्हाणे, संजू पानसंबळ, बाबासाहेब घोळवे, दत्तात्रय भुजाङी, अमोल लोखंडे,बाळासाहेब मापारे,संतोष कदम,ताकटे, संदीप कोळसे, बाळासाहेब घाङगे,राजू पाटोळे,राजश्री तनपूरे, ,दीपाली ताकटे,रूपाली खंडागळे, जयश्री पवार, 


रूपाली जाधव, मिना माने, भारती राउत,मनीषा गाढे हे माजी विद्यार्थी ,विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत विश्वासराव  व त्यांना  सहकार्य राजेश मंचरे यांनी केले.श्रीशिवाजी विद्यानिकेतचे प्राचार्य श्री. म्हसे यांचे विशेष आभार मानले. आभार प्रदर्शन पत्रकार राजेंद्र साळवे व संजय धावङे यांनी करून स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत