देवळाली प्रवरात २ डिसेंबरपासून भव्य कीर्तन महोत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात २ डिसेंबरपासून भव्य कीर्तन महोत्सव

  देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सत्यजित कदम फाउंडेशन व समस्त देवळाली प्रवरा शहरवासियांच्यावतीने २ ते ६ डिसे...

 देवळाली प्रवरा/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सत्यजित कदम फाउंडेशन व समस्त देवळाली प्रवरा शहरवासियांच्यावतीने २ ते ६ डिसेंबर या कालावधीत भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

    धार्मिक , सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या सत्यजित कदम फाउंडेशनच्या देवळाली प्रवरा परिसरात नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. देवळाली प्रवरा बाजारतळ येथे  २ डिसेंबर ते ६ डिसेंबर २०२१  या कालावधीत किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आले असून महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मंडळींचे कीर्तन श्रवणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

देवळाली प्रवरा बाजारतळ येथे भव्य उभारण्यात येण्या भव्य- दिव्य किर्तन मंडपात रात्री ८ ते १० या वेळेत किर्तन महोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. २ डिसेंबर रोजी ह.भ.प उमेश महाराज दशरथे (आळंदी), ३ डिसेंबर रोजी ह.भ.प नरेंद्र महाराज गुरव (मालेगाव), ४ डिसेंबर रोजी ह.भ.प अक्रुर महाराज साखरे, ५ डिसेंबर रोजी ह.भ.प जगन्नाथ महाराज पाटील (मुंबई) यांची कीर्तन संपन्न होणार आहे.  तर ६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत महंत उद्धव महाराज मंडलिक (संत तुकाराम महाराज देवस्थान, नेवासा) यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. सर्व किर्तनसेवांना वारकरी संप्रदाय परिवारातील गायनाचार्य, वादक, टाळकरी यांची  साथसंगत लाभणार आहे. 


 तरी या कीर्तन महोत्सवाचा देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सत्यजीत कदम फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.


पद्मश्री पोपटराव पवार  व मनालीताई सप्रे यांचे व्याख्यान

अहमदनगर जिल्ह्याचे भूषण तथा आदर्श हिवरे बाजारचे प्रवर्तक पद्मश्री पोपटराव पवार यांचे ४ डिसेंबर रोजी व्याख्यान सायंकाळी ४ ते ६ या वेळेत व्याख्यान संपन्न होणार असून विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव ही करण्यात येणार आहे. तसेच ५ डिसेंबर रोजी डोंबिवली येथील मनालीताई सप्रे यांचे व्याख्यान संपन्न होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा निमित्त भव्य मिरवणूक

 संत ज्ञानेश्वर माऊली यांचा समाधी सोहळा २ डिसेंबर रोजी सर्वत्र साजरा होत असताना देवळाली प्रवरा शहरातून याच दिवशी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत टाळ-मृदुंगाच्या गजरात भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असून यात सर्व भाविक, माता-भगिनी, अबाल-वृद्धांनी सहभागी व्हावे असे आवाहन सत्यजीत कदम फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत