लिंभारा मैदान, स्वामी श्री समर्थ मंदिरामागे पेव्हिंग ब्लॉक, विजेचे पोल बसवा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लिंभारा मैदान, स्वामी श्री समर्थ मंदिरामागे पेव्हिंग ब्लॉक, विजेचे पोल बसवा

कोपरगाव प्रतिनिधी:-   कोपरगाव शहरातील लिंभारा मैदान व श्री स्वामी समर्थ मंदिरामागे पेव्हिंग ब्लॉक बसवावे व पथदिव्यांचे विजेचे पोल बसवावे अशी...

कोपरगाव प्रतिनिधी:-

 कोपरगाव शहरातील लिंभारा मैदान व श्री स्वामी समर्थ मंदिरामागे पेव्हिंग ब्लॉक बसवावे व पथदिव्यांचे विजेचे पोल बसवावे अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.


 
आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, लिंभारा मैदान परिसरात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी या परिसरात व श्री स्वामी समर्थ मंदिरामागे पेव्हिंग ब्लॉक बसवावे.तसेच रात्रीच्या वेळी अंधार असल्यामुळे अनेक अडचणींचा नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यासाठी पथदिव्यांचे विजेचे पोल बसवावे अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये किशोर पगारे घर ते संतोष काजळे घर, गिरीश चव्हाण घर ते श्री स्वामी समर्थ मंदिर भिंत, विनोद ठाकूर घर ते विलास गायकवाड घर, अबीद बागवान घर ते गफूर बागवान घर, निलेश महाले घर ते सोनू भुल्लर घर, न्यायालय भिंत ते सागर आदमाने घर व श्री स्वामी समर्थ मंदिरामागे ब्लॉक बसवून मिळावे. 


सोनू भुल्लर, संतोष गवूल, निलेश महाले, सागर आदमाने, गिरीश चव्हाण, विलास गायकवाड यांचे घराजवळ पथदिव्यांचे विजेचे पोल बसवावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी फकीर कुरेशी,राजेंद्र जोशी ,चांदभाई पठाण, वाल्मिक लाहिरे, संतोष टोरपे, सुभाष ठोंबरे, नितीन पवार, सोनू भुल्लर, सुशीला टोरपे, शकुंतला अष्टेकर, गिरीष चव्हाण, सुरेखा कदम,गंगाबाई खरोटे, रवी भोपे, रेखा मोरे, श्रीकांत पगारे,संगीता जाधव, शकीला बागवान, विलास गायकवाड, शमा भाबी बागवान, ज्योती संधू, संध्या ठाकूर, श्रीमती ठोंबरे आदी उपस्थित होते. 


सदरच्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करून पुढील कार्यवाही करू असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी यांनी दिले आहे.


       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत