देवळाली प्रवरा/वेबटीम:- गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे शाळा महाविद्यालय बंद होते मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू होते दरम्यान इतर सर्व प...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे शाळा महाविद्यालय बंद होते मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू होते दरम्यान इतर सर्व परीक्षा विनासायास पार पडल्या मात्र विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात महत्त्वाचे असलेले चित्रकला ग्रेड ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या झाल्या नाहीत त्या परीक्षा या चालू शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाच्यावतीने अहमदनगर जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक काळे व सचिव बाळासाहेब पाचरणे यांनी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अहमदनगरचे जिल्हाधिकरी डॉ.राजेंद्र भोसले यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
यावेळी देविदास जगधने,दत्तू साळवे उपस्थित होते राज्य कलाध्यापक संघाच्या वतीने राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना ही निवेदन देण्यात येत आहेत.
राज्य अध्यक्ष पी.आर.पाटील, सरचिटणीस एम.ए कादरी यांनी ही परीक्षा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत