संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये प्रवेश सुविधा केंद्र सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये प्रवेश सुविधा केंद्र सुरू

कोपरगांव(वेबटीम) संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मधिल अद्ययावत संगणकीय प्रयोगशाळा, पुरेशा  क्षमतेची इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित  व योग्य संवाद साध...

कोपरगांव(वेबटीम)

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मधिल अद्ययावत संगणकीय प्रयोगशाळा, पुरेशा  क्षमतेची इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित  व योग्य संवाद साधणारा प्राद्यापक वर्ग, इत्यादी बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश  परीक्षा कक्षाच्या वतीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये २०२१- २२ च्या प्रथम व थेट द्वीतिय वर्ष  अभियांत्रिकी  प्रवेशासाठी दि. ०२ नोव्हेंबर पासुन ऑनलाईन  प्रवेश  सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) सुरू झाले असुन विद्यार्थ्यांनी  दि. १८ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन  रजिस्ट्रेशन करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे, अशी  माहिती संस्थेचे डायरेक्टर डाॅ. ए.जी.ठाकुर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.




 पत्रकात डाॅ. ठाकुर यांनी सांगीतले आहे की प्रथम वर्षाच्या  प्रवेशासाठी भारतीय नागरीकत्व असेलेल्या विध्यार्थ्यांना  इ. १२ वी (सायन्स) मध्ये खुल्या गटासाठी किमान ४५ टक्के व मागासवर्गिय गटासाठी किमान ४० टक्के गुण आवष्यक आहे. मात्र प्रवेशासाठी एमएचटीसीईटीचेच गुण विचारात घेतले जाणार आहेत. तसेच थेट द्वीतिय वर्षाच्या  प्रवेशासाठी  इंजिनिअरींगचा डीप्लोमा प्रथम श्रेणीत उत्तिर्ण असणे गरजेचे आहे.




 इंजिनिअरींग प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी येथिल सुविधा केंद्राच्या मार्फत संजीवनीसह  महाराष्ट्रात  कोठेही प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. विध्यार्थ्यांना  या  केंद्रामार्फत त्यांचा कल आणि सध्या मागणी असलेल्या पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांविषयी सखोल मार्दर्शन  करण्यात येणार आहे. ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना  आता इंजिनिअरींग प्रवेश  प्रक्रिया व पदवी अभियांत्रिकी  शिक्षण  पुर्ण केल्यावर भविष्यातील  संधी हे जाणुन घेण्यासाठी आता कोठेही जाण्याची गरज नाही.

 या संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुकांनी संजीवनी सुविधा केंद्रास भेट देवुन ऑनलाईन  प्रवेश  प्रक्रिया पुर्ण करावी, उमेदवारांच्या जाती निहाय संवर्गानुसार आवश्यक  कागदपत्र व इतर माहितीसाठी या केंद्रातुन मार्गदर्शन  करण्यात येणार आहे. तज्ञ प्राद्यापकांची या केंद्रात नेमणुक केली असुन शिष्यवृत्या , शैक्षणिक  कर्ज व त्यासाठी लागणारे कागदपत्र, तसेच शैक्षणिक  प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र या संदर्भात सखोल माहिती येथे मिळणार आहे. अधिक माहितीसाठी डाॅ. आर.एस. शेंडगे  (८२७५२८२१२१) अथवा  प्रा. एन.डी. कपाले  (८२०८३२९००२) यांच्याशी  संपर्क साधावा असे डाॅ. ठाकुर यांनी शेवटी सांगीतले आहे.  


सदरचे प्रवेश  सुविधा केंद्र रविवार व इतर सुट्यांच्या  दिवशीही सकाळी १० ते सायंकाळी ५. ३० वाजेपर्यंत खुले असणार आहे, मात्र  दिवाळी निमित्ताने शासनाच्या आदेशानुसार दि. ४ ते ७ नोव्हेंबर पर्यंत या सुविधा केंद्रास सुटी असणार आहे, याची संबंधित विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत