अहमदनगर/वेबटिम:- अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयाला लागलेली आग ही खुप निंदनीय व दुर्दैवी घटना आहे. ह्या आगीमध्ये सुमारे दहा रुग्णांचा आगीमध्य...
अहमदनगर/वेबटिम:-
अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयाला लागलेली आग ही खुप निंदनीय व दुर्दैवी घटना आहे. ह्या आगीमध्ये सुमारे दहा रुग्णांचा आगीमध्ये होरपळून मृत्यु झाला आहे .त्या मध्ये मृत्यु झालेल्या नातेवाईक यांना शासनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करावी. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून फायर ऑडिट केले आहे की नाही हे ही पूर्णपणे तपासावे अशी मागणी आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी म्हंटले आहे.
पगारे यांनी म्हंटले की सिव्हिल येथील आगेच्या घटनेची गांभीर्य लक्षात घेता सखोल चौकशी करुन जिल्हा सिव्हिल सर्जन व दोषी असणारे अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करुन सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा .भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून फायर ऑडिट केले आहे की नाही हे ही पूर्णपणे तपासावे .
तसेच घटनेची निष्पाप पणे चौकशी करुन मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय द्यावा तसेच सिव्हील हॉस्पिटलचे डॉ.पोखरणा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे आरपीआय आरपीआय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर आंदोलन छेडेल असा इशारा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत