राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ताहाराबाद रोड येथे सुरु असलेली भाजी मंडई लवकरात लवकर स्थलांतरित करून...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ताहाराबाद रोड येथे सुरु असलेली भाजी मंडई लवकरात लवकर स्थलांतरित करून नगरपालिकेच्या जागेत स्थलांतरित करावी अशी मागणी आरपीआयचे शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे यांनी केली आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राहुरी फॅक्टरी येथील आंबेडकर चौकामधील तहाराबाद रोड या ठिकाणी भाजी विक्रेते व अन्य व्यवसाय करणारे यांना देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मार्फत उपजीविकेसाठी पालिकेमार्फत स्वतंत्र जागा देण्यात यावी
कारण हा परिसर या ठिकाणी येणारे जाणारे वाहतूक मोठ्या प्रमाणात असून पुढील काळात या ठिकाणी मोठा अनर्थ होऊ शकतो व भविष्यात या ठिकाणी कुठलीही जीवित हानी होऊ शकते या निवेदनात नमूद केले आहे
सदर भाजीविक्रेत्यांना ५ डिसेंबर पर्यंत पालिकेने जागा न दिल्यास आम्ही पालिकेसमोर आरपीआय स्टाईलने आंदोलन करणार आहोत.असे आरपीआयचे शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे यांनी सांगितले आहे.
निवेदनावर निलेश त्रिभुवन, सुरज खरात,इमरान शेख,दिलीप माने,जुबेर कुरेशी,दिपक सांगळे, राजूभाऊ थोरात,असलम शेख, प्रकाश सांगळे,प्रवीण पाळंदे आदी आरपीआय कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत