गोवंशहत्या करणाऱ्या इतकेच शहरात मोकाट जनावरे सोडणारेही तितकेच जबाबदार- नगराध्यक्ष वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गोवंशहत्या करणाऱ्या इतकेच शहरात मोकाट जनावरे सोडणारेही तितकेच जबाबदार- नगराध्यक्ष वहाडणे

  कोपरगाव/वेबटीम:- - गोवंशहत्या करणाऱ्या कसया इतकेच शहरात मोकाट जनावरे सोडणारे तितकेच जबाबदार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांन...

 कोपरगाव/वेबटीम:-

- गोवंशहत्या करणाऱ्या कसया इतकेच शहरात मोकाट जनावरे सोडणारे तितकेच जबाबदार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाद्वारे केले.

नगराध्यक्ष वहाडणे यांनी प्रसिद्ध केले की, आज वसूबारस आहे,तरीही काहीजण या मुक्या प्राण्यांना शहरात कचरा-खरकटे खाण्यासाठी सोडून देतात. अनेकदा कॅरीबॅग,प्लास्टिक आदी कचरा खाऊन जनावरे मरतातही. तसेच या मोकाट जनावरमुळे मोठ्या प्रमाणात रहदारीला अडथळे येतात त्यातून छोटे मोठे अपघातही होतात.  तरीही काही बेजबाबदार-मुर्ख मालक गोवंश शहरात सोडून देतात.या मुळे  गोवंशहत्या करणाऱ्या कसायांइतकेच शहरात मोकाट जनावरे सोडणारे नागरिक ही घातकच आहेत. अनेकवेळा शहरात फिरणारी जनावरे जप्त केली तरीही निर्ढावलेले काहीजण  पुन्हा पुन्हा नियम कायदे पायदळी तुडवितांना दिसत आहेत.

    नगरपालिका प्रशासनाने किती वेळा तेच तेच काम करायचे.आधीच नगरपरिषदेकडे अधिकाऱ्यांची- कर्मचाऱ्यांची वाणवा असतांना दैनंदिन कामे करणेही अवघड होऊन जाते.त्यामुळे जनतेनेही जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे.  जनावरांच्या मालकांनी आपापली जनावरे आपापल्या घरी गोठ्यात बांधून ठेवून त्यांचे व्यवस्थित संगोपन करावे अशी नम्र अपेक्षा मी कोपरगाव शहरातील बोटावर मोजण्या इतक्या शहरात मोकाट जनावरे सोडणाऱ्या नागरिकांन कडून करतो असे प्रतिपादन नगराध्यक्ष वहाडणे यांनी केले आहे.

गोपालकांनो लक्षात घ्या वसुबारस आहे आज तरी  गायी वासरे सुरक्षित ठेवा सणासुदीला तरी त्यांची काळजी घ्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत