चांदेकसारे गावात गायत्री कंपनीचा मनमानी कारभार!!- रावसाहेब होन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चांदेकसारे गावात गायत्री कंपनीचा मनमानी कारभार!!- रावसाहेब होन

कोपरगाव/वेबटीम:-   कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावातून नावाप्रमाणेच समृद्ध असा समृद्धी महामार्ग जात असून या कामाचा ठेका चांदेकसारे हद्दीत...

कोपरगाव/वेबटीम:-

 


कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावातून नावाप्रमाणेच समृद्ध असा समृद्धी महामार्ग जात असून या कामाचा ठेका चांदेकसारे हद्दीत गायत्री कन्स्ट्रक्शन या कंपनीला आसुन ही कंपनी स्थानिक शेतकऱ्यांचा जमिनीची रस्त्याचे नुकसान करत मनमानी दडपशाही पदतीने वागत आसल्याचे चित्र कायम समोर येत आहे.


सविस्तर वृत्त असे की,  कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावात समृद्धी महामार्ग कामकाज चालू असून रावसाहेब रामजी होन यांची चांदेकसारे गावात शेती असून सर्वे नंबर ५ यातुन  गायत्री कंपनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रावसाहेब रामजी होन यांच्या शेतातून डंपरची वाहतूक सुरूच आहे. 



यासंदर्भात रावसाहेब होन यांनी  गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांना याविषयी कल्पना दिली की आमच्या शेतातून डंपरची वाहतूक करू नये त्यामुळे सदर  शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसेच घरांना भेगाही पडत आहे या विषयी वारंवार कल्पना गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे .रावसाहेब होन यांच्या सर्वे नंबर ५ लगत दलित वस्ती असून रात्रीच्या वेळी गायत्री कंपनीचे डंपर वेगवान वेगाने धावत असतात त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे चांदेकसारे गावात गायत्री कंपनीचा हा मनमानी कारभार पाहता यांना कोणी पाठीशी घालीत आहे का असा प्रश्न रावसाहेब होन  त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. गायत्री कंपनीने वेळीच डंपर बंद करावा नाहीतर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असा इशारा रावसाहेब होन यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत