राहुरी फॅक्टरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

राहुरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात सुरू असलेली अवैध हातभट्टी दारू व्यवसाय व देशी दारू विक्री तातडीने बंद करावा अशी मागणी ...

राहुरी(वेबटीम):-


राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात सुरू असलेली अवैध हातभट्टी दारू व्यवसाय व देशी दारू विक्री तातडीने बंद करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष विक्रांत पंडीत यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे.


 
या निवेदनात म्हंटले की, प्रसादनगर भागात राजरोसपणे अवैध हातभट्टी दारू व्यवसाय व देशी दारू विक्री सुरू असल्याने गुन्हेगारी प्रमाण वाढले असून वादावादीच्या घटना तसेच गुन्हेगारी प्रमाण वाढलेले आहे. याबाबत रास्ता रोको आंदोलन गेल्या काही महिन्यांपूर्वी केले असता तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी अवैध दारू विक्री बंद करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.


 सध्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असून तातडीने सदर अवैध व्यवसाय बंद न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा विक्रांत पंडित, प्रतीक जाधव, शरद साळवे, सागर उल्हारे, प्रसाद शिंदे, प्रफुल्ल ओहळ, आशु सांगळे,  प्रमोद साठे, गोपाल गायकवाड, आदित्य आल्हाट, यशोदिप पंडित आदींनी दिला  आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत