राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- दिवाळी सणाच्या औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुरी फॅक्टरी शाखेच्या वतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
दिवाळी सणाच्या औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुरी फॅक्टरी शाखेच्या वतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये राहुरी फॅक्टरी व तालुक्यातील जवळपास 40 ते 45 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून या स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक राहुरी फॅक्टरी येथील वंदे मातरम द्वितीय क्रमांक गौरव रणसिंग राहुरी तर तृतीय क्रमांक युवराज साळुंखे राहुरी फॅक्टरी यांनी पटकविला आहे . लवकरच पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे मनविसे अध्यक्ष संदेश पाटोळे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत