राहुरी नगरपरिषद प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनांचे पालन व्हावे, आरपीआयची मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी नगरपरिषद प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनांचे पालन व्हावे, आरपीआयची मागणी

  राहुरी(वेबटीम):- राहुरी नगरपरिषद प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनांचे तंतोतंत पालन व्हावे. अन्यथा संघटनेच्या वतीने दाद मागितली जा...

 राहुरी(वेबटीम):-


राहुरी नगरपरिषद प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनांचे तंतोतंत पालन व्हावे. अन्यथा संघटनेच्या वतीने दाद मागितली जाईल. असा इशारा आरपीआय कडून राहुरी नगरपरिषद प्रशासनाला निवेदना द्वारे देण्यात आलाय. 


      दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आगामी २०२२ या वर्षात राहुरी नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणुक होणार आहे. त्याकरीता आपणास राज्य निवडणुक आयोगाने निर्देश देऊन प्रभाग रचना करतांना नैसर्गिक हद्दी, खुणा, एकत्रित वसाहतीचे विभाजन न करणे तसेच रस्ते, ओढे यांचे बांध निश्चित करणे. त्याच प्रमाणे एस सी, एस टी समुहाच्या वसाहतीचे विभाजन न करणे यासारख्या मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहे. या सुचनाचे आपणाकडुन काटेकोरपणे पालन व्हावे.

        कारण सन २०१६ च्या नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडनुकामध्ये राज्य निवडणुक आयोगाने घालुन दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करुन राहुरी शहरात १० नंबर प्रभागाची रचना करतांना अनेक गंभीर चुका झालेल्या आहेत. त्यामध्ये कानिफनाथ चौक प्रभाग क्र. १९ मध्ये राहणाऱ्या समुहाला हद्दी ओलांडुन दुसऱ्या हद्दीत समाविष्ट केलेले होते. त्यामुळे त्या समुहाला अत्यंत माणसिक त्रासाला सामोरे जावे लागले. 


त्यासंदर्भात त्या नागरीकांना उच्च न्यायालयात दाद मागावी लागली होती. असे अनेक प्रकार राहुरी शहरात प्रभाग रचना करताना झालेले आहे. त्यामुळे वरील प्रमाणे गंभीर चुकांची पुनरावृत्ती होऊ नये. याकरीता राज्य निवडणुक आयोगाच्या सुचनांचे तंतोतंत पालन व्हावे. अन्यथा यासंदर्भात योग्य त्या जबाबदार माध्यमाकडे संघटनेच्या वतीने दाद मागण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे.


 

       आरपीआय चे तालूकाध्यक्ष विलासनाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनावर सुनिल चांदणे, अरूण साळवे, सचिन साळवे, बिलालभाई शेख, नविन साळवे, विकास काशिद, दिपक साळवे, राजेंद्र दाभाडे, दुर्गेश वाघ, आदिंच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत