सात्रळ(वेबटीम):- नगर सिव्हील हाॅस्पीटलला लागलेल्या आगीची जबाबदारी निश्चित करून प्रशासनातील संबंधित अधिकारी किंवा पदाधिकारी यांच्यावर मनुष्य...
सात्रळ(वेबटीम):-
नगर सिव्हील हाॅस्पीटलला लागलेल्या आगीची जबाबदारी निश्चित करून प्रशासनातील संबंधित अधिकारी किंवा पदाधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचे गून्हे दाखल करा.व मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमींना भरीव मदत जाहीर करावी असे पत्र मुख्यमंतत्री उद्धव ठाकरे यांना उपसरपंच किरण पाटील अंञे पाठविले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणात आग लागून एक न अनेक पेशंट मृत्यूमुखी पडले आहे. मागील काळात राज्यात अशाच प्रकारच्या घटना घडत होत्या त्या वेळेस संपूर्ण हॉस्पिटलची राज्यातील फायर ऑडिट करुण घेण्याचे आदेश आरोग्यमंत्री यांनी दिले होते.
तरी सुद्धा अहमदनगर च्या सिव्हिल रुग्णालयाचे संबधित अधिकारी, गहाळ राहिले या सिव्हील हॉस्पिटलचे फायर ऑडिट झालेले आहे का नाहि.झाले असेल तर दर सहा महिन्याला फायर यंत्र सुरळीत चालतात का नाही याची खात्री करून घेतली गेली पाहिजे होती.
इलेक्ट्रिक यंत्रणा सुरळीतआहे का नाही त्याचे ऑडिट सुध्दा वारंवार करणे गरजेचे होते परंतू असे काही झालेले दिसत नाही. मागच्या दोन दिवसांपूर्वीच सिव्हील सर्जन यांच्या गाडीला हॉस्पिटलच्या आवारात पार्किंग मध्ये आग लागली होती. इतके झाले तरी बारीक लक्ष ठेवत काळजी घेणे गरजेचे होते. परंतू असे काही झाले नाही.
दोन दिवसानंतर आज सिव्हील हॉस्पिटलच्या आय सी यू विभागाला आग लागून अनेक पेशंट चा मृत्यु झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी आहेत.तरी या आग्नीताडंवाची चौकशी करून संबधीतावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा.व या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व गंभीर जखमींना तातडीने जास्तीत जास्त भरीव मदत जाहीर करावी. अशी मागणी सोनगाव चे उपसरपंच किरण पाटील अंञे यांनी मेल द्वारे निवेदन पाठवुन केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत