पानेगाव-: (वार्ताहर) दिपावलीचे औचित्य साधून अहमदनगर जिल्हा परिषद खरवंडी गटाचे सदस्य तथा अर्थ, पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांनी मुळाथडी प...
पानेगाव-: (वार्ताहर)
दिपावलीचे औचित्य साधून अहमदनगर जिल्हा परिषद खरवंडी गटाचे सदस्य तथा अर्थ, पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांनी मुळाथडी परीसरातील कामांसाठी दिलेल्या निधीतून सर्वच कामे प्रगतीपथावर असून पानेगाव, अंमळनेर,शिरेगांव ,खेडलेपरमानंद ग्रामस्थांनी समाधान व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत पानेगाव उपसरपंच तथा महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामराजे जंगले, सचिव किशोर जंगले जनार्दन गागरे, दिपक जंगले, संदिप जंगले, चैतन्य उद्योग समूहाचे संचालक अनिल जंगले महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे,खेडलेपरमानंद येथील अजित ईनामदार, रमेश राजळे आदी सह मान्यवर सुनिल गडाख यांचा सन्मान केला.
यावेळी किशोर जंगले यांनी पानेगाव येथील सुरू असलेल्या कामाची माहिती देवून पाहणी करण्यासाठी तसेच लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने निमंत्रण देवून काही उर्वरित कामासाठी हि निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी सुनिल गडाख यांनी देवून सर्व टीमने आभार व्यक्त केले.
खेडलेपरमानंद येथील शिवसेनेचे अजितभाई ईनामदार व रमेश राजळे, यांनी सांगितले की आमच्या गावांमध्ये सुनीलभाऊंनी मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याने अनेक कामं मार्गी लागले. त्याबद्दल जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील तसेच सुनिल गडाख यांचे आभार व्यक्त केले.
सन्मानला उत्तर देताना सभापती गडाख यांनी सांगितले की, जनतेचे सहकार्य, प्रेम हे शक्य होत असून कुठलेच काम शिल्लक राहणार नाही विकास गंगा गावापासून वाड्यावस्त्यांवर पोहचली असून प्रत्येक ठिकाणी चाललेलं कामावर लक्ष ठेवून असल्याचे गडाख यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत