कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरातील टिळकनगर परिसरातील संविधान चौक मंडळाच्यावतीने शुक्रवारी (ता.२६) संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. य...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
शहरातील टिळकनगर परिसरातील संविधान चौक मंडळाच्यावतीने शुक्रवारी (ता.२६) संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याचबरोबर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना व लहान मुलांना बिस्कीटे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यध्यक्ष संदीप वर्पे, नगरसेवक मंदार पहाडे, संजय कांबळे, नानासाहेब जगताप, अमोल शिंदे, संजय दुशिंग, साहेबराव शिंदे, लक्ष्मण शिंदे, विशाल शिंदे, विशाल कोपरे , संजय कोपरे, राजेंद्र उशिरे, रवी जाधव, सुनील जाधव, नानासाहेब मोरे, अशोक शिंदे, शुभम शिंदे, रवी शिंदे, गणेश शिंदे, अवी शिंदे, आकाश शिंदे, सचिन शिंदे, सुनील जगताप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब मोरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली. शेवटी संविधान चौक ग्रुपचे संस्थापक नितीन शिंदे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत