राहुरी विद्यापिठाच्या हद्दीतील उजव्या कालव्यात रानडुक्कर मृतावस्थेत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी विद्यापिठाच्या हद्दीतील उजव्या कालव्यात रानडुक्कर मृतावस्थेत

राहुरी(वेबटीम):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ हद्दीतील उजव्या कालव्यामध्ये रानडुकर मृतावस्थेत पडून असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आरपी...

राहुरी(वेबटीम):-

महात्मा फुले कृषी विद्यापीठ हद्दीतील उजव्या कालव्यामध्ये रानडुकर मृतावस्थेत पडून असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आरपीआय आंबेडकर गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


मुळा धरणाचा उजवा कालवा हा विद्यापीठाच्या हद्दीतून वाहत जातो. उजव्या कालव्यातून शेतकर्‍यांना आवर्तन देण्यासह विद्यापीठाला पिण्याचे पाणी देणे, शेती संशोधनासाठी याच कालव्यातून पाणी दिले जाते. दरम्यान, विद्यापीठाला दिल्या जाणार्‍या पीण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत अनेकदा संशय व्यक्त झालेले आहे. उजव्या कालव्यामध्ये काही दिवसांपासून रानडुक्कर मृतावस्थेत पडून असल्याचे आरपीआय आंबेडकर गटाचे तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांना दिसून आले.  पाण्यामध्ये पडून असलेल्या रानडुकरामुळे दुर्गंधी निर्माण झाली. यासह पाण्यामध्ये जंतू निर्माण होऊन पाणी प्रदुषित झाले. 


पाटबंधारे विभाग व विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे अनेक दिवसांपासून रानडुक्कर मृतावस्थेत उजव्या कालव्यामध्ये पडून होते. त्यामुळे दोन्ही प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत प्रदीप मकासरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत