कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावात दर शनिवारी भरत असलेल्या आठवडे बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला पहायला मिळातो आह...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावात दर शनिवारी भरत असलेल्या आठवडे बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला पहायला मिळातो आहे. दुकानदार गिऱ्हाईक दोघांचा ही तोंडाला मास्क नाही नागरिक लहान -लहान मुलांना घेऊन फिरताना दिसतात या दिवशी पंचक्रोशीतल नागरीक बाजारात येतात तसेच शेतकऱ्यांनी शेतात पिकवल्याला माल दुसरीकडे घेऊन न जात आपल्या गावातील आठवडे बाजारात विकला जातो तसेच दुस-या गावातील व्यापारी येत असतात.
या पार्श्वभुमीवर दि २०.११.२०२१ रोजी भरलेल्चा आठवडे बाजारात वेगळे चित्र बघायला मिळाले. शासनाने आठवडे बाजार भरवण्यास परवानगी देताना काही नियम पाळण्यास सांगीतले होते याचा नागरीकांना विसर पडलेला दिसत आहे.
तसेच स्थानिक प्रशासना ने सुद्धा हि गोष्ट गांभिर्याने घेतलेली दिसत नाही कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवण्याच्या दृष्टीने शासन युध्दस्तरावर उपाययोजना करत आहे शासनाने काही प्रमाणात सर्व खुले केले आहे पण कोरोना संपला नाही हे आपण विसरता कामा नये स्थानिक प्रशासनाने सुद्धा गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सुनिल होन यांनी म्हटले आहे.
तरी सर्व नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मास्क लावणे गरजेचे आहे आठवडे बाजारामध्ये जी व्यक्ती मास लावणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.यासाठी चांदेकसारे ग्रामपंचायतीने व पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच पोलिसांनी चांदेकसारे आठवडे बाजारात एक तरी फेरी मारावी अशी मागणी सुनील होन यांनी केली आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत